कर्ज व नापिकीस कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 05:54 PM2019-07-02T17:54:14+5:302019-07-02T17:54:52+5:30
मुरलीधर याच्याकडे हदगाव शाखेच्या एसबीआए बँकेचे पिककर्ज होते
हदगाव( नांदेड ) : पिंपरखेड येथिल मुरलीधर कुंडलिक मुळे (३०) या तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुरलीधर हे सोमवारी (दि.१ ) रात्री जेवण करून जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात मुक्कामी जात असल्याचे सांगून गेले. आज सकाळी मोठे बंधू शेतात गेल्यानंतर त्यांना मुरलीधर दिसून आले नाही. त्यांनी शोध घेतला असता मुरलीधरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मनाठा पोलिसांना माहिती दिली.
मुरलीधर याच्याकडे हदगाव शाखेच्या एसबीआए बँकेचे पिककर्ज होते त्यामुळे ते तणावाखाली होते यावर्षी पेरणीच झाली नाही पावसाने एक महीना दडी मारली त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.