पाणी वाचविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:28+5:302021-02-11T04:19:28+5:30
जिल्हास्तरीय कॅच द रेन अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कॅच द रेनच्या लोगोचे ...
जिल्हास्तरीय कॅच द रेन अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कॅच द रेनच्या लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ७०० जिल्ह्यामध्ये कॅच द रेन (पावसाचे पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील गावांचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत गावातील किमान १०० कुटुंबानी छतावर पडणारे, शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वन विभाग, सिंचन विभाग एनजीओ व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आदी उपस्थित होते.