तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:06+5:302021-03-23T04:19:06+5:30
टेनिस बॉल क्रिकेटचे सामने भोकर : तालुक्यातील पोमनाळा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन जि.प. कृषी ...
टेनिस बॉल क्रिकेटचे सामने
भोकर : तालुक्यातील पोमनाळा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले. यावेळी सभापती जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, सरपंच उज्ज्वल केसराळे, मनोज गिमेकर, धर्माजी बाशेट्टी, कमरसिंग जाधव, आनंद पाटील, रवी गंटेवार उपस्थित होते. स्पर्धेत ६० संघाने सहभाग घेतला. सुभाष राठोड व केशव पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला.
फरार आरोपीस अटक
नायगाव : २०१६ मध्ये घडलेल्या केबल वायर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात नायगाव पोलिसांना यश आले. मरवाळीत ही घटना घडली होती. सुरेश लोहकरे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. तो २० मार्च रोजी मरवाळीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सपोनि कांबळे यांनी जमादार ज्ञानोबा देवकत्ते, विलास मुस्तापुरे, पोलीस नायक मेडेवार, चालक मल्लू राजमोड यांच्या मदतीने केली.
जनसंपर्क कार्यालय बंद
लोहा : नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे यांचे वजिराबाद नांदेड येथील जनसंपर्क कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी कोरोनाची काळजी घ्यावी, अनावश्यक फिरू नये, असे आवाहन हंबर्डे यांनी केले.
वाळू माफियांवर कारवाई करा
कंधार : तालुक्यातील वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदाडे व पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पाणीपुरवठ्यासाठी उपोषण
माहूर : माहूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. तरीही नगर पंचायतीने मुबलक पाणीपुरवठा न केल्याने काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी उपोषणाचा इशारा दिला. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष शीतल जाधव, उपनगराध्यक्षा अश्विनी तुपदाळे व मुख्याधिकारी विद्या कदम यांना निवेदन दिले.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
मुखेड : तालुक्यातील मुक्रमाबाद येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायतीने कारवाई केली. नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
भाजयुमोचे निवेदन
अर्धापूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोनल केले जाईल, असा इशारा भाजयुमोच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, आत्माराम राजेगोरे, विराज देशमुख, जठन मुळे, सखाराम क्षीरसागर, कृष्णा इंगोले, योगेश हळदे, तुळशीराम बंडाळे, देवीदास कल्याणकर, महेश भुसे, शिवराज मुळे आदी उपस्थित होते.