गावाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे - आदर्श सरपंच भास्करराव पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:01+5:302020-12-17T04:43:01+5:30

लिंगापूर ता. हदगाव येथे जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हदगाव- हिमायतनगर विधानसभेचे नेते बाबूराव कदम ...

Young people should come forward for the development of the village - Adarsh Sarpanch Bhaskarrao Pere | गावाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे - आदर्श सरपंच भास्करराव पेरे

गावाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे - आदर्श सरपंच भास्करराव पेरे

Next

लिंगापूर ता. हदगाव येथे जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी हदगाव- हिमायतनगर विधानसभेचे नेते बाबूराव कदम कोहळीकर तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राम कदम,विलास माने, भगवान कदम,शेख रहीम,अविनाश कदम राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक तथा आयोजक भागवत देवसरकर आदी विचारपीठावर उपस्थित होते.

भास्करराव पेरे यांनी उपस्थित नागरिकांना त्यांनी विकासाच्या पाटोदा गावात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. गावकऱ्यांनी मनात आणले तर गावाचा सर्वांगीण विकास होण्यास काहीच वेळ लागणार नाही त्यामुळे आपलालाच आपल्या गावाचा विकास करावा लागेल. यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन सर्व गावातील नागरिकांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विविध योजना राबवून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करावा असेही आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजक भागवत देवसरकर यांनी भूमिका विशद केली. यावेळी परिसरातील उपस्थित नागरिकांना बाबूराव कदम कोहलीकर,गजानन जाधव वाटेगावकर,अक्षय पतंगे यांनी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे कर्मचारी महेश गोरेगावकर, नंदू पाटील नरवाडे, अनिल देवसरकर, संदीप जाधव यांच्यासह तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष परशुराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन देवसरकर, सुनील देवसरकर, संतोष पाटील देवसरकर, ज्ञानेश्वर देवसरकर, अविनाश देवसरकर,भगवान देवसरकर,आकाश कवडे,संदीप कवडे,टोपाजी गाढे यांच्यासह गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Young people should come forward for the development of the village - Adarsh Sarpanch Bhaskarrao Pere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.