युवतीची विहिरीत उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:38+5:302021-07-14T04:21:38+5:30
दिव्यांगांना स्मार्ट कार्डचे वाटप निवघा बाजार - हदगाव तालुक्यातील दिव्यांगांना बस आगाराच्या वतीने स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. ५० ...
दिव्यांगांना स्मार्ट कार्डचे वाटप
निवघा बाजार - हदगाव तालुक्यातील दिव्यांगांना बस आगाराच्या वतीने स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. ५० रुपये फी भरून दिव्यांगांनी स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी केले. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. कार्ड वितरणप्रसंगी जमीर पटेल, सुनील व्यवहारे, रमेश चव्हाण, नोंदणी अधिकारी एम. डी. चव्हाण उपस्थित होते.
१० गावात लसीकरण
विष्णूपुरी - प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंड उपकेंद्र विष्णूपुरीअंतर्गत १० गावात लसीकरण करण्यात आले. याकामी वैद्यकीय अधिकारी डॉ. लता मुदिराज, डॉ. संध्या हंबर्डे, डी.आर. खरबे, श्रीमती भालेराव, बी.पी. चिंतावार, एम. एम. अली, एस. व्ही. लटपटे, एस. व्ही. गोडबोले, डी. रामदा, भिसे यांनी परिश्रम घेतले. विष्णूपुरी ८४७, मार्कंड ५५८, धनगरवाडी २९९, पांगरी ८३, कल्हाळ १६३, पिंपळगाव २८५, भनगी २१०, वाहेगाव २५३, गंगाबेट १७२, खुपसरवाडी ६७ आदी प्रमाणे लसीकरण करण्यात आले.
विजेच्या धक्क्याने बैल दगावला
कौठा - विजेचा तीव्र धक्का बसल्याने बैल दगावल्याची घटना काटकळंबा ता. कंधार येथे घडली. वजीर अल्लाबक्ष पठाण यांचा हा बैल होता. त्याची किंमत ६० हजार रुपये होती.
मिनकीत लोकार्पण सोहळा
बिलोली - तालुक्यातील मिनकी येथे शाळा व अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. या कामाचा लोकार्पण सोहळा आ. राम पाटील रातोळीकर, जि.प. सदस्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या हस्ते झाला. याशिवाय खतगावकर व आ. राम पाटील रातोळीकर यांनी दिलेल्या निधीतील सभागृहाच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी झाले. सरपंच चंद्रकला पाटील बिराजदार यांनी याकामी पुढाकार घेतला. कार्यक्रमास पं.स. सभापती सुंदराबाई पाटील, तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील, चेअरमन बालासाहेब पाटील, रवी पाटील खतगावकर, आनंदराव बिराजदार, इंद्रजित तुडमे, शांतेश्वर पाटील, धोंडीबा मिस्त्री, नागनाथ पाटील माचनूरकर, हणमंत पाटील बामणीकर आदी उपस्थित होते.
पहिली शिक्षण परिषद
किनवट - केंद्रीय प्राथमिक शाळा मारेगाव संकुलातील जि.प. प्रा. शाळा राजगड तांडा येथे पहिली शिक्षण परिषद घेण्यात आली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विजय मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रमेश खुपसे, दीपक राणे, दीपक डंबाळे होते. प्रास्ताविक गंगाधर पुलकंठवार, सूत्रसंचालन सुरेश पाटील तर आभारप्रदर्शन किशन कर्णेवार यांनी केले. शिक्षक चंद्रशेखर सरटे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विविध माहिती दिली.
रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे
मारतळा - नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून ते कापसी खु. व वाळकी खु. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली. रस्ता बांधणीसाठी १५ लाख रुपये खर्च झाले. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. खड्डेमय रस्त्यांना काटेरी झुडपाने वेढले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.