उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:00 AM2019-05-30T01:00:26+5:302019-05-30T01:01:25+5:30
शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात झालेल्या रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली़ मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन शवविच्छेदन करण्यास हरकत घेतली असून आता नांदेड येथे शवविच्छेदन होणार आहे.
भोकर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात झालेल्या रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली़ मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन शवविच्छेदन करण्यास हरकत घेतली असून आता नांदेड येथे शवविच्छेदन होणार आहे.
शहरातील नवीआबादी येथील रहिवासी असलेला १९ वर्षीय युवक कृष्णा दत्ता गोरे हा वडीलासोबत ट्रकवर हमालीचे काम करतो. त्यास उन लागल्याने फेवर आजाराने ग्रस्त झाल्यामुळे त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी सकाळी ९ वाजता दाखल केले होते. त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.महमद फैसल महमद सादिक उपचार करीत असताना रुग्णांचा त्याच रात्री ९ वाजता मृत्यू झाला.
मयताच्या नातेवाईकांनी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. महंमद फैजल यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास मनाई केल्याने मयताचा मृतदेह बुधवारी दिवसभर रुग्णालयातच ठेवण्यात आले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी मध्यस्थी करुन मयताचे शवविच्छेदन नांदेड येथे इन कॅमेरा करण्याच्या अटीवर नातेवाईक तयार झाले़