तरुणाई इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:45+5:302021-03-15T04:16:45+5:30
त्यातूनच तो इंटरनेट गेमिंगकडे वळला. मोबाइलवर मारधाड करणारे गेम तो खेळायचा. त्यामध्ये शस्त्र खरेदीसाठी पैसेही खर्च करायचा. वेळप्रसंगी त्याने ...
त्यातूनच तो इंटरनेट गेमिंगकडे वळला. मोबाइलवर मारधाड करणारे गेम तो खेळायचा. त्यामध्ये शस्त्र खरेदीसाठी पैसेही खर्च करायचा. वेळप्रसंगी त्याने घरातील पैसे चोरण्यास सुरुवात केली होती. आईला ही बाब समजल्यानंतर त्यांनी मुलाला मारहाण केली; परंतु पुढे पैसे चोरण्याचे प्रकार वाढतच गेले. एके दिवशी आईने मुलाला नेट कॅफे येथून मारत घरी आणले. त्यामुळे चिडलेल्या मुलाने आईवर चाकूने सपासप वार केले. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंटरनेटवर हिंसक गेम खेळून मुलाची मानसिकताच तशी झाली होती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याचाच तो विचार करीत होता. नांदेडात अशाप्रकारे गेम्सच्या आहारी जाऊन हिंसक झालेली मुले मानसोपचार तज्ज्ञांकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर हा प्रकार नुकताच उदयास आला आहे. यात व्यक्तीला इंटरनेटवर किंवा मोबाइलवर गेम्स खेळण्याची तीव्र इच्छा होते. खेळता आले नाही तर ते बेचैन होतात. गेम्स खेळण्यासाठी ते अनेक आनंददायी गोष्टी सोडण्यास तयार होतात. त्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी असते. दारू, बिडी, गांजा यासारखेच इंटरनेट गेमिंगचे व्यसन आहे. या गेम्समुळे त्या व्यक्तीचा स्वभाव हिंसक होतो. त्यामुळे योग्य समुपेदशन आणि उपचाराची गरज आहे.
- डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ