युवकाने वाचविले चिरलीच्या ग्रामस्थाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:01+5:302020-12-14T04:32:01+5:30
सदर व्यक्ती चिरली येथील असून, दत्ताहारी कदम असे त्यांचे नाव आहे. ते अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांचा डोक्याला दुखापत झाल्याचे ...
सदर व्यक्ती चिरली येथील असून, दत्ताहारी कदम असे त्यांचे नाव आहे. ते अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांचा डोक्याला दुखापत झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड यांनी जखमीवर उपचार केले. संजय गोनेलवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, डॉ. बालाजी सातमवाड, डॉ. विनोद माहुरे यांचे जनमानसातून कौतुक होत आहे.
गावपुढारी लागले कामाला
मतदानाला कमी कालावधी असल्याने इच्छुकांची होतेय धावपळ
निवघा बाजार : प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम एकादाचा जाहीर झाला. यामुळे इच्छुक आणि पॅनल प्रमुख कामाला लागले असून, निवडणूक महिनाभरावर असल्याने विविध कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ होताना दिसून येत आहे.
निवघा बाजार परिसरातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी २०२१ ला होणार असल्याने पॅनल तयार करणे, उमेदवारांची चाचपणी करण्यास जास्त काळ नसल्याने इच्छुक व पॅनल प्रमुखांची धावपळ वाढली आहे. शुक्रवारी रात्री ग्रा.पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ज्यांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची आहे, आरक्षित जागेवरील पॅनल प्रमुखांनी निवड केलेल्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नाही असे इच्छुक उमेदवार शनिवारी सकाळीच तहसील कार्यालयात जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कायकाय कादपत्रे लागतात याची विचारणा करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
प्रत्येक गावात प्रामुख्याने दोनच पॅनल ग्रामपंचायत निवडणूक लढवितात; परंतु यावेळी तरुण पिढी तिसरी आघाडी म्हणून ग्रा.पं. निवडणूक रिंगणात उतरणार आहे. तिसरी आघाडी खर्चाचा मेळ कसा करायचा अन् कोण करणार यावरच जास्त चर्चा होताना दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने थंडीच्या दिवसांत राजकारण तापत आहे.