तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकाविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:45+5:302021-07-07T04:22:45+5:30

जिल्ह्यात चार दुचाकी चोरीला जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. चार दुचाकी चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुलशन कॉलनी ...

The youth snatched the mobile from his hand | तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकाविला

तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकाविला

Next

जिल्ह्यात चार दुचाकी चोरीला

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. चार दुचाकी चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुलशन कॉलनी येथून मोहम्मद इलियास नूर महंमद, विठ्ठलनगरातून ज्ञानेश्वर गिरजाजी पवार, उमरी तालुक्यातील सिंधी येथे लिंगूराव देवराव कवळे तर बेटसांगवी येथून गोविंद विश्वनाथ वानखेडे यांची दुचाकी चोरीला गेली आहे.

पोलीस उपनिरीक्षकाची कार लांबविली

बॉम्ब शोधक आणि नाशिक पथकात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाची सात लाख रुपये किमतीची कार चोरट्याने लांबविली. ही घटना ४ जून रोजी वसमत फाटा येथे घडली.

पोउपनि प्रसेनजीत चंद्रकांत जाधव यांनी एमएच १५, जीए ६७६६ या क्रमांकाची मारोती सुझुकी कंपनीची कार वसमत फाटा येथील रिजवान हॉटेलच्या मोकळ्या जागेत ठेवली होती. ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्याने ही कार लांबविली. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

घर घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना शहरातील पिरबुऱ्हाणनगर येथे घडली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने उपाशीपोटी ठेवून पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

दोन ठिकाणी जुगारावर धाड

शहरात वजिराबाद आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी जुगारावर धाड मारण्यात आली. भगतसिंग रोडवरून पाच हजार रुपये तर एसबी बारच्या पाठीमागे सुरू असलेल्या अड्ड्यावरून १ हजार २०० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणात दोन्ही ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

देशी दारूची वाहतूक करताना पकडले

शहरातील आनंदनगर ते नाईक चौक येथे जात असलेल्या रस्त्यावर दुचाकीवरून दारूची अवैधपणे वाहतूक करीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून चार हजारांची दारू आणि दुचाकी असा १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: The youth snatched the mobile from his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.