जिल्हा परिषदेला मिळाले नवे सात अधिकारी, ग्रामीण यंत्रणेचा कारभार तुबाकले यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:24+5:302021-09-10T04:25:24+5:30
ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नामदेव केंद्रे यांची जालना जिल्हा परिषदेमधून नांदेड येथे बदली झाली आहे. एस. ...
ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नामदेव केंद्रे यांची जालना जिल्हा परिषदेमधून नांदेड येथे बदली झाली आहे. एस. एस. तायडे यांची धुळे येथून पदोन्नतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, भोकर जिल्हा परिषद नांदेड येथे बदली झाली आहे. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चार गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पंचायत समिती महागाव जिल्हा यवतमाळ येथून मयूरकुमार आदेलवाड यांची हिमायतनगर येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. पूर्णा येथून गटविकास अधिकारी अमित राठोड हे बदलीने भोकर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून, तर धर्माबाद येथील गटविकास अधिकारी श्रीकांत बलदे यांची पंचायत समिती मुदखेड येथे बदली झाली आहे. माळदा, जि. रायगड येथील गटविकास अधिकारी एन. शिवराज प्रभे यांची उमरी येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.