जिल्हा परिषदेचे पथक आज घेणार धान्यांचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:41+5:302021-09-22T04:21:41+5:30
जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, वाई बाजार, ता. माहूर येथील शालेय पोषण आहारांतर्गत पुरवठा झालेल्या धान्यादी मालाच्या निकृष्ट दर्जाची चौकशी, ...
जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, वाई बाजार, ता. माहूर येथील शालेय पोषण आहारांतर्गत पुरवठा झालेल्या धान्यादी मालाच्या निकृष्ट दर्जाची चौकशी, पडताळणी करण्यासाठी सदर पथक बुधवारी नमुने घेणार आहे. शालेय पोषण आहारात हरभरा आणि मूगदाळ असे दोन प्रकारचे धान्य वाटप करण्यात आले होते. या दोन्ही धान्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रादेशिक अन्न प्रयोगशाळा, औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहेत.
चौकट...
सर्व प्रक्रियेचे होणार व्हिडिओ शूटिंग
सदर पथक प्रत्यक्ष उपस्थित राहून धान्याचे नमुने घेणार आहे. नमुने घेत असताना व्हिडिओ शूटिंग करण्यासह विविध अंगाने फोटो काढण्याच्या सूचनाही समितीला दिल्या आहेत. त्याचबरोबर माल प्राप्त झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत मुख्याध्यापकांनी तत्काळ गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात का कळविले नाही, याबाबतही समितीमार्फत मुख्याध्यापकांचा लेखी जबाब घेण्यात येणार आहे.