लोकन्यायालयात एक कोटी 19 लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:10 PM2018-09-09T13:10:18+5:302018-09-09T13:10:31+5:30

1 crore 19 lakh compensation in the local court | लोकन्यायालयात एक कोटी 19 लाखांची भरपाई

लोकन्यायालयात एक कोटी 19 लाखांची भरपाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकन्यालयात मोटर अपघाताची 105 प्रकरणे निकाली निघून 1 कोटी 19 लाख 77 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्हा न्यायालयात शनिवार, 8 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे अर्थात वीज, बँका यांचे थकीत बिले आपसात तडजोडीने निकाली होण्यासाठी ठेवण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव न्या. सतिष मालविये यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधिश वर्ग एकचे आर.एस.गुप्ता,  दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायादंडाधिकारी जी.एच.पाटील उपस्थित होते. त्यांचे पॅनेल होते. केदार, एस.व्ही.गवळी, एस.व्ही.पाटील, राहुल निकुंभे, कढरे, डी.एस.मराठे या विधितज्ञांनी सहकार्य केले.
न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी व फौजदारी आणि मोटर अपघाताचे एकुण 467 दावे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 105 दावे निकाली निघाले. त्यातून एक कोटी 19 लाख 77 हजार 859 रुपयांची वसुली झाली.
बँक कर्ज व वीज, पाणी, घरपट्टी आणि फोन थकबाकी वसुलीसाठी 1,846 प्रकरणांपैकी 25 प्रकरणे निकाली निघून पाच लाख तीन हजार 280 रुपयांची वसुली झाली. 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यांनी यशस्वीतेसाठी प्रय} केले.

Web Title: 1 crore 19 lakh compensation in the local court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.