25 लाखांच्या लॉटरीचे अमिष देत युवकाची 1 लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:21 PM2019-10-18T12:21:43+5:302019-10-18T12:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील तोंबीकुवा (मोरखी) येथील 21 वर्षीय युवकाला 25 लाख रुपयांची ऑनलाईन लॉटरी लागल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील तोंबीकुवा (मोरखी) येथील 21 वर्षीय युवकाला 25 लाख रुपयांची ऑनलाईन लॉटरी लागल्याचे भासवून 1 लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आह़े 9 ते 16 ऑक्टोबरदरम्यान युवकासोबत अज्ञात भामटय़ांनी संपर्क करुन हा प्रकार केला होता़
नितीन महेंद्र पाडवी असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून त्याला 9 ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने संपर्क करुन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले होत़े हे पैसे मिळवण्यासाठी काही रकमेचा भरणा करावा लागेल असे अज्ञातांनी सांगितले होत़े त्याच्यावर विश्वास ठेवत नितीन महेंद्र पाडवी याने भामटय़ाने दिलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांवर 1 लाख 12 हजार 200 रुपयांचा भरणा करुन दिला होता़ यानंतरही 25 लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर नितीन याने पोलीसांकडे संपर्क केला़
याबाबत नितीन पाडवी याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात भामटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़
फसवणूक झालेला विद्यार्थी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मोबाईलवर अज्ञात भामटय़ाने संपर्क करुन त्याला भूलथापा दिल्या होत्या़ सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ऑनलाईन ठग पोहोचू लागल्याने चिंता वाढल्या आहेत़ तालुक्यात यापूर्वीही असे प्रकार घडून फसवणूक झाली आह़े