अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास 10 वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:14 PM2018-06-29T13:14:29+5:302018-06-29T13:14:41+5:30

10 years imprisonment for minor girl in rape case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास 10 वर्षाचा कारावास

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास 10 वर्षाचा कारावास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त करणा:या आरोपीस शहादा न्यायालयाने 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आह़े 2015 मध्ये ही अत्याचाराची घटना घडली होती़ 
म्हसावद गाव ते राणीपूर रोड लगत प्रकाश ऊर्फ नाना किशन सूर्यवंशी यांच्या मालकीचा ढाबा आह़े या ढाब्यावर 2015 मध्ये रोशन पावरा याने अल्पवयीन युवतीला भांडी घासण्याच्या कामाला आणले होत़े या युवतीला प्रकाश सूर्यवंशी याने लगA आणि घर बांधण्याचे अमिष दिले होत़े यातून त्याने तिच्यावर सात ते आठ महिने लैंगिक अत्याचार केले होत़े ढाब्याजवळ असलेल्या मोहन फकीरा अहिरे यांच्या मालकीच्या बंद घराच्या छतावर हा अत्याचा झाला होता़ यादरम्यान प्रकाश सूर्यवंशी याने मुमताज हसन पठाण हिच्या मदतीने युवतीचा गर्भपात केला होता़  याबाबत युवतीच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ शहादा न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक हिरालाल चौधरी व पोलीस उपअधीक्षक शिवाजी गावीत यांनी तिघांविरोधात दोषारोपपत्र सादर केले होत़े यानुसार चालवल्या गेलेल्या खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़बी़नायकवाड  यांनी प्रकाश किशन सूर्यवंशी रा़ म्हसावद यास कलम 376 (1)(2) (आय) (एन) सह बाल लैंगिक अधिक कायद कलमांन्वये 10 वर्ष सश्रम कारावास आणि 6 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली़ 
सरकारी वकील अॅड़ स्वर्णसिंग गिररासे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई प्रमोद पाटील यांनी कामकाज पाहिल़े तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस उपअधिक्षक शिवाजी गावीत व अॅड़ गिरासे यांचे पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे तसेच जिल्हा सरकारी वकील अॅड सुशील पंडीत यांनी कौतूक केले आह़े 

Web Title: 10 years imprisonment for minor girl in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.