१०० आॅक्सिजन सिलींडर हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:39 AM2020-07-16T11:39:51+5:302020-07-16T11:40:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा आता तोकड्या पडू लागल्या आहेत़ ...

100 oxygen cylinders in the air | १०० आॅक्सिजन सिलींडर हवेत

१०० आॅक्सिजन सिलींडर हवेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा आता तोकड्या पडू लागल्या आहेत़ यात जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात दर दिवशी किमान १०० आॅक्सिजन सिलींडरचा पुरवठा व्हावा यासाठी आता प्रशासन पाठपुरावा करत आहेत़ तूर्तास रुग्णालयात दरदिवशी ५६ ते ६० सिलींडरच पुरवले जात आहेत़
जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्ष आणि नर्सिंग कॉलेज या दोन ठिकाणी व्हेंटीलेटर लावण्यात आले आहेत़ या व्हेंटीलेटरसाठी आॅक्सिजन, नायट्रस आॅक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड यांचे सिलींडर वेळोवेळी लागत आहेत़ जिल्हा रुग्णालयात धुळे येथून या सिलींडरचा दरदिवशी पुरवठा करण्यात येतो़ परंतु ही मागणी एकूण १०० सिलींडर दररोज द्यावेत अशी आहे़ त्यातुलनेत होणाऱ्या सिलींडरचा पुरवठा अत्यंत कमी असून हे सिलींडर धुळे येथून येत असल्याची माहिती समोर आली आहे़ आरोग्य विभागाकडून गेल्यावर्षी निविदा काढून कंत्राटदाराला ठेका देण्यात आला आहे़ मिळालेल्या माहितीनुसार हा ठेका अद्यापही सुरू असून ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सिलींडर लावण्याची कोणतीही व्यवस्था नसताना त्यासाठीही सिलींडरची निविदा गेल्यावर्षी काढण्यात आली होती हे विशेष़ गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना कोविड कक्षात कृत्रिम श्वासोच्छास्वास प्रणालीवर ठेवून त्यांच्या शरीरात कमी झालेली आॅक्सिजन मात्रा वाढीवर भर देण्यात येत असल्याने आॅक्सिजन सिलींडरचा पुरवठा वाढीवर भर देण्याची गरज आहे़ रुग्ण वाढल्यास सध्या असलेले सिलींंडर आणि त्याला जोडलेले बेडही कमी पडून वाढीव सिलींडर आणि बेड निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे़


जिल्हा रुग्णालयात ६६० लीटर क्षमतेचे एक सिलींडर १८० रूपयांना, १ हजार ३२० लीटरचे सिलींडर १९० रुपयांना, जम्बो सिलींडर ३९२ रूपये दराने पुरवले जात आहे़ सोबत १ हजार ८५१ लीटर क्षमतेचे नायट्रोक्स आॅक्साईड सिलींडर ९६३ रुपयांना, ३ हजार ७४४ लीटरचे सिलींडर १ हजार ५०६ रुपयांना, कार्बन डायआॅक्साईडचे ९ किलोचे मोठे सिलींडर ३२४ रूपयाला पुरवण्यात येत आहे़ बाजारभावानुसार हे दर असल्याची माहिती आहे़
४सिलींडरच एकीकडे तुटवडा असताना दुसरीकडे बेडची संख्या अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे़ रुग्णालयाच्या नेत्र कक्षात २५ तर नर्सिंग कॉलेजमध्ये १० अशा ३५ बेडला आॅक्सिजन सिलींडर लावण्याची सोय आहे़ अद्याप रुग्णांची संख्या ही नियंत्रणात असली तरी गंभीर रुग्णांची संख्या मात्र २७ ते ३० च्या जवळपास आहे़ दोन्ही कक्षातील सर्व बेड एकाच वेळी फुल झाल्यास नव्याने येणाऱ्या गंभीर पेशंटचे काय असाही प्रश्न समोर येत आहे़


जिल्हा रुग्णालयात सध्यातरी सिलींडरचा तुटवडा नाही़ धुळे येथून दर दिवशी किमान ६० च्या जवळपास सिलींडरचा पुरवठा केला जातो आहे़ हा पुरवठा अद्याप थांबलेला नाही़ गरज वाटल्यास सिलींडरचा पुरवठा वाढवला जाईल़ पाठपुरावा सुरू आहे़ तत्पूर्वी रुग्ण कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
-डॉ़ के़डी़सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबाऱ

Web Title: 100 oxygen cylinders in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.