‘प्रगत’ अभियानाअंतर्गत 100 शिक्षकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:48 AM2017-08-31T10:48:22+5:302017-08-31T10:48:22+5:30

नंदुरबार तालुका : वर्षभरात सर्व शाळा प्रगत करणार

 100 teachers training under 'Advanced' campaign | ‘प्रगत’ अभियानाअंतर्गत 100 शिक्षकांना प्रशिक्षण

‘प्रगत’ अभियानाअंतर्गत 100 शिक्षकांना प्रशिक्षण

Next


ऑनलाईन लोकमत
31 ऑगस्ट 
नंदुरबार : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत तालुक्यातील 100 शिक्षक व 20 अधिका:यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या काळात तालुका पुर्णपणे प्रगत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 
गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत हे प्रशिक्षण चावरा विद्यालयात घेण्यात आले. विषय मुळ समजून घेणे, प्रत्येक विद्यार्थी प्रगत करणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकार अरुण पाटील, तेजराव गाडेकर, पुणे डायटचे व्याख्याता मधुकर माने, गट शिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील, डायटचे व्याख्याता चौधरी आदी उपस्थित होते. 
शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले, प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक विद्याथ्र्याच्या चाचणीतील प्रश्ननिहाय वेिषण करून मूळनिहाय अध्यापनाचे नियोजन करण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थी आपण प्रगत करू शकतो हा विश्वास प्रत्येक शिक्षकाने निर्माण करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. 
सी.के.पाटील यांनी विविध बाबींवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन वसंत पाटील यांनी केले. तालुक्यातील विविध शाळांमधील 100 शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title:  100 teachers training under 'Advanced' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.