जिल्ह्यातील धरणांमध्ये 100 टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:37 PM2019-08-14T12:37:13+5:302019-08-14T12:37:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व 37 लघु प्रकल्प आणि दोन्ही बॅरेज प्रकल्प वगळता चार मध्यम प्रकल्पात 100 ...

100% water in dams in the district | जिल्ह्यातील धरणांमध्ये 100 टक्के पाणी

जिल्ह्यातील धरणांमध्ये 100 टक्के पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व 37 लघु प्रकल्प आणि दोन्ही बॅरेज प्रकल्प वगळता चार मध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाला आह़े यामुळे दोन वर्षापासून दुष्काळझळा सोसत दिवस कंठणा:या जिल्हावासियांना सतत भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आह़े 
जिल्ह्यात आतार्पयत तब्बल सरासरी 92 टक्के पावसाची नोंद झाली आह़े जुलैच्या अंतिम ते ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात सर्वत्र कोसळलेल्या दमदार पावसामुळे नदीनाले दुथडी भरुन वाहू लागल्याने लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा दिवसेंदिवस वाढत होता़ रविवारी पूरस्थिती ओसरल्यानंतरही नदी नाल्यांचे पाणी वाहत असल्याने धरणे 100 टक्के भरल्याने सांडव्यांवरुन पाणी वाहू लागले होत़े पाण्याची स्थिती मजबूत झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी आगामी 12 महिन्यार्पयत चांगली राहून शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आह़े जिल्ह्यातून वाहणा:या नद्यांना आणखी पूर येण्याची शक्यता असल्याने जलसाठा दीर्घकाळ स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े 

जिल्ह्यात एकूण 37 लघुप्रकल्प आहेत़ या प्रकल्पांची एकूण जलसाठवण क्षमता ही 95़03 दशलक्ष घनमीटर आह़े आजअखेरीस या सर्व प्रकल्पांमध्ये 88़50 दशलक्ष घनमीटरपाणीसाठा झाला आह़े या पाण्याची पातळी एकूण 3 हजार 124़79 मीटर आह़े सर्वच प्रकल्प नव्वदी पार असल्याने साठय़ात वाढ झाली आह़े सर्व प्रकल्प मिळून 83 टक्के जलसाठा झाला असला तरी 30 प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले असल्याने जिल्ह्याच्या खात्यात 100 टक्के पाणीसाठा झाल्याचे बोलले जात आह़े विशेष म्हणजे गेल्यावर्षी आजच्याच दिवशी या सर्व 37 लघुप्रकल्पांमध्ये केवळ 33़19 दशलक्ष घनमीटर अर्थात केवळ 38 टक्के पाणीसाठा होता़

जिल्ह्यात मध्यमप्रकल्पांची स्थितीही मजूबत असून रंगावली प्रकल्पात 100 टक्के साठा झाला आह़े प्रकल्पात 12़89 दशलक्ष घनमीटर तसेच तालुक्यातील भरडू  मध्यम प्रकल्पात 65 टक्के तर पळशी येथील कोरडी मध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाला आह़े  नंदुरबार तालुक्यातील शिवण मध्यम प्रकल्पात 85 टक्के साठा झाला असून येथे 17़65 दशलक्ष घनमीटर पाणी आह़े शिवण नदीच्या पाणलोट क्षेत्रातून अद्यापही पाणी वाहत असल्याने हा प्रकल्प 100 टक्के भरण्याचे निश्चित मानले जात आह़े शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात 100 टक्के साठा आह़े जिल्ह्यातील  मध्यम प्रकल्पात 67़04 टक्के पाणी साठा झाला आह़े

नवापुर तालुक्यातील हळदाणी 85 टक्के, खोकसा 97, खडकी, खेकडा, मेंदीपाडा, मुगधन, नावली, रायंगण, सोनखडकी, सुलीपाडा, विसरवाडी या प्रकल्पात 100 टक्के पाणी साठा झाला आह़े 
नंदुरबार तालुक्यातील धनीबारा 78, आंबेबारा, खोलघर, कोकणीपाडा, पावला, शनिमांडळ, शिरवाडे, ठाणेपाडा 1 आणि 2, वासदरा येथे 100 टक्के तर वसलाय 66, वावद लघु प्रकल्पात 60 टक्के जलसाठा झाला आह़े 
शहादा तालुक्यातील दूधखेडा, खापरखेडा, राणीपूर, शहाणे, लंगडीभवानी, कोंढावळ 100 टक्के आणि लोंढरे लघु प्रकल्पात 81 टक्के जलसाठा झाला आह़े 
अक्कलकुवा तालुक्यात खडकुना प्रकल्प 100 टक्के भरुन वाहत आह़े 
तळोदा तालुक्यातील गढावली, गोपाळपूर, रोझवा, सिंगसपूर 100 टक्के, महूपाडा लघुप्रकल्पात 83  टक्के जलसाठा झाला आह़े 
धडगाव तालुक्यातील मुंगबारी या एकमेव लघुप्रकल्प 100 टक्के पूर्णक्षमतेने भरला आह़े 
नवापुर तालुक्याततील खडकी, मुगधन, नावली, सोनखडकी, सुलीपाडा, नंदुरबार-कोकणीपाडा, शनिमांडळ, ठाणेपाडा 1 आणि 2, वावद, शहादा तालुक्यातील लंगडीभवानी, लोंढरे आणि तळोदा तालुक्यातील गढावली हे प्रकल्प आजच्या तारखेला पूर्णपणे कोरडे होत़े वर्षभराने  त्यात पाणीसाठा झाला आह़े 

मध्यम आणि लघु प्रकल्पांसोबत जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने उभारलेल्या 12 लघुपाटबंधारे योजनांमध्येही 74 टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद आह़े यात नवापुर तालुक्यातील मेंदीपाडा, देवळीपाडा, ढोंग, नेसु, भुरीवेल आणि नंदुरबार तालुक्यातील रंकानाला हे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील अमरावती नाला प्रकल्पात तब्बल 12 वर्षाच्या कालावधीनंतर 15 टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यातील चौपाळे येथे 97 तर घोटाणे येथे 55 टक्के पाणीसाठा आह़े शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्पात 50 तर चिरडा आणि तळोदा तालुक्यातील निझरा नदीवर उभारण्यात आलेल्या धनपूर प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती आह़े 
 

Web Title: 100% water in dams in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.