Vidhan Sabha 2019 : 109 अपक्षांनी अजमावले नशीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:46 AM2019-10-17T11:46:23+5:302019-10-17T11:47:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दर निवडणुकीत आणि प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असतात. काहीजण नुसतेच उमेदवारी करायचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दर निवडणुकीत आणि प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असतात. काहीजण नुसतेच उमेदवारी करायचे म्हणून करतात तर काहीजण थेट विजयाच्या इर्षेने मैदानात उतरतात. आतार्पयतच्या 12 निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारसंघातून 109 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोघांच्याच गळ्यात विजयाची माळ पडून आमदारकी मिळू शकली आहे. दरम्यान, या निवडणुकीत देखील नऊ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा सामना प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना करावा लागतो. यंदा देखील जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात अपक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहे. यात अक्कलकुवा मतदारसंघात नागेश पाडवी, नवापूर मतदारसंघात शरद गावीत तर शहादा मतदारसंघात जेलसिंग पावरा यांचा त्यात समावेश आहे.
शहादा मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत सर्वाधिक अर्थात नऊ अपक्ष उमेदवार होते. त्यानंतर 2004 च्या निवडणुकीत या मतदारसंघात आठ अपक्ष होते. 1978 च्या निवडणुकीत ही तीन अपक्षांनी नशीब अजमविण्याचा प्रय} केला होता. अर्थात 2004 र्पयत जिल्ह्यातील शहादा हा एकमेव सर्वसाधारण मतदारसंघ असल्यामुळे अनेकांच्या उडय़ा या मतदारसंघावर पडत होत्या.
यंदाही नऊ उमेदवार रिंगणात
यंदाच्या निवडणुकीत देखील नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार नवापूर मतदारसंघात चार आहे. तर अक्लककुवा व नंदुरबार मतदारसंघात प्रत्येकी दोन तर शहादा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार यंदा नशीब अजमावत आहेत. यातील नवापूर, अक्कलकुवा व शहाद्याच्या अपक्ष उमेदवारांनी यंदा लक्ष वेधले आहे.
मतांची टक्केवारी जेमतेमच
अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतांची टक्केवारी देखील जेमतेमच राहत आहे. केवळ 11995 च्या निवडणुकीचा अपवाद राहिला आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील पाच पैकी दोन मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून गेले होते. त्यात नंदुरबार मतदारसंघातून डॉ.विजयकुमार गावीत तर अक्राणी मतदारसंघातून अॅड.के.सी.पाडवी हे निवडून आले होते. त्या निवडणुकीत अपक्षांनी घेतलेल्या मतांची संख्या तब्बल 1 लाख 45 हजारापेक्षा अधीक होती.
दोघांना संधी
नंदुरबार मतदारसंघातून आतार्पयत 16 अपक्षांनी आपले भाग्य अजमावले आहे. पूर्वीचा अक्राणी व आताचा अक्कलकुवा मतदारसंघातही अनेकांनी नशीब अजमविण्याचा प्रय} केला आहे. अकरा निवडणुकांमध्ये एकुण 25 अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. या मतदारसंघात 1995 मधील निवडणुकीत सात अपक्ष उमेदवार उभे होते.
प्रत्येक निवडणुकीत अपक्षांचा भरणा मोठय़ा प्रमाणावर असतो. काही अपक्ष प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून देखील उभे केले जातात. जेणेकरून आपला प्रतिस्पर्धी उमेदवार अडचणीत यावा. शिवाय जात-पात आणि पक्षाचा देखील अपक्ष उभे करतांना विचार केला जातो. याचा सर्वाधिक फटका शहादा मतदारसंघात बसत आहे.
शहादा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होता तेंव्हा अनेकांच्या उडय़ा पडत होत्या. आता आदिवासी राखीव झाला असला तरी तीच परिस्थिती गेल्या तीन निवडणुकीत दिसून आली आहे.
आतार्पयत सर्वाधिक अपक्ष उमेदवारांची संख्या शहादा मतदारसंघात कायम, यंदा मात्र केवळ एक अपक्ष उमेदवार रिंगणात
केवळ 1995, 2004 व 2009 च्या निवडणुकीतच अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज पोहचली एक लाखांच्या वर.
यंदाच्या निवडणुकीत नऊ अपक्ष उमेदवार आहेत. परंतु अक्कलकुवा, नवापूर व शहादा मतदारसंघातील अपक्षांनी लक्ष वेधले आहे.
अनेकवेळा प्रमुख उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते फोडण्यासाठी देखील अपक्षाला उभे केले जाते.