पानबाराजवळ रूग्णवाहिकेला अपघात 11 जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:43 PM2018-06-23T12:43:35+5:302018-06-23T12:48:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पानबारा ता़ नवापूर गावाजवळ भरधाव वेगातील पिकअप वाहनाने रूग्णवाहिकेला धडक दिल्याने 11 जण जखमी झाल़े यात तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना धुळे येथे हलवण्यात आल़े
वासदा (गुजरात) येथील धन्वंतरी ट्रस्ट आय हॉस्पिटलतर्फे मोतीबिंदू असणा:या वृद्ध रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जात़े शुक्रवारी सकाळी ट्र्स्टच्या एमएच 01 एल 6783 या रूग्णवाहिकेतून साक्री तालुक्यातील भामेर व निजामपूर परिसरातील रूग्णांना घेऊन असताना पानबारा ता़ नवापूर येथील गतिरोधकाजवळ रूग्णवाहिकेचा वेग कमी झाला़ यावेळी मागून भरधाव वेगाने येणा:या पिकअप क्रमांक एमएच 50-6028 या वाहनाने धडक दिली़ यात किरण डोमाळे (24), जितेंद्र राजपूत (24), भानुदास पाटील (30, सर्व रा.धुळे) हे तिघे गंभीर जखमी तर गोविंद नामू सोनवणे (75), भावडय़ा हरी सोनवणे (68), फुला डोंगर निकुम (71), सुमन सोमनाथ सोनार (68, सर्व रा.भामेर, ता.साक्री), कमलबाई गुलाब हिरे (69, रा.निजामपूर, ता.साक्री), निंबाबाई रघुनाथ सोनवणे (65, रा.लासूर, ता.चोपडा), कमलबाई गोरख धनगर (65, पडसाने), गोजरबाई उत्तम महाले (63, जैताणे, ता.साक्री) यांना किरकोळ जखमा झाल्या़ गंभीर जखमींना धुळे येथील रूग्णालयात हलवण्यात आले आह़े
विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ़ अजय कंवर, परिचारिका अंजना गावीत, प्रसन्ना वसावे व कर्मचारी यांनी उपचार केल़े