11 कार्यालयांचे कामकाज धुळ्यातूनच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:02 PM2019-01-21T13:02:33+5:302019-01-21T13:02:42+5:30
राज्य कर्मचारी महासंघ : नंदुरबारात सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नंदुरबार : जिल्हानिर्मितीनंतर 21 वर्षातही 11 विभागांची कार्यालये नंदुरबारात सुरू झालेली नाहीत. धुळे येथूनच या विभागांचे कामकाज सुरू आहे. तातडीने ही कार्यालये नंदुरबारात सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे करण्यात आली आहे.
राज्य कर्मचारी महासंघाने याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रय} केला आहे. याबाबत महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, 1998 मध्ये जिल्हा निर्मितीनंतर अनेक कार्यालय सुरू झाली. परंतु 21 वषरानंतरही 11 विभागांची कार्यालये सुरू झालेली नाही. त्यात औषध प्रशासन विभाग, वैद्य मापन शास्त्र विभाग, जलसंपदा विभाग (कार्यकारी अभियंता पाटबंधारे) वनविभाग, कामगार न्यायालय, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय, जिल्हा मत्स्य व्यवसाय विभाग, रिमांड होम व शिशू गृह, विभागीय डाक कार्यालय अािण जलसंधारण विभाग यांचा समावेश आहे. कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने वेळोवेळी शासनाकडे याबाबतच्या कार्यवाहीची मागणी केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार व प्रधान सचिव यांनी लेखी पत्राद्वारे महासंघाला कार्यवाही सुरू असल्याचे सुचीतही केले होते. महासंघाने याबाबत पुन्हा मुख्यमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व संबधीत विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. 11 कार्यालयांचे कामकाज धुळ्याहून सुरू असल्यामुळे संबधीत विभागाच्या कामांकडे दुर्लक्ष होते तर नागरिकांची कामानिमित्त धुळे येथे जाण्यासाठी फरफट होते. काही विभागांचा कारभार हा प्रभारींवर देखील सुरू आहे. त्यामुळे तातडीने संबधीत 11 कार्यालये सुरू करावी अशी मागणी आहे.