नंदुरबार जिल्ह्यात 12 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन
By admin | Published: June 12, 2017 05:25 PM2017-06-12T17:25:23+5:302017-06-12T17:25:23+5:30
फळ लागवडीला प्राधान्य : जिल्हाधिका:यांची माहिती
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.12 : जिल्ह्याला 10 लाख 59 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात 12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतक:यांना उत्पन्न देणा:या वृक्षांना महत्त्व दिले जाणार असून स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, जिल्ह्यात यंदा 12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने 10 कोटी 59 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यापेक्षा अधीक वृक्ष लागवड होणार आहे. नरेगाअंतर्गत जवळपास एक लाख फळ लागवडीचे नियोजन आहे. नंदुरबार तालुक्यात 100 हेक्टर, नवापूर तालुक्यात 150 हेक्टर, तळोदा तालुक्यात 100 हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात 200 हेक्टर, धडगाव तालुक्यात 160 तर शहादा तालुक्यात 100 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लावगड करण्यात येणार आहे. आवळा, पेरू, सिताफळ, डाळींब या रोपांवर अधीक भर राहणार आहे.
वनपट्टे दिलेले आहेत अशा शेतक:यांना वृक्ष लागवडीसाठी अधीक प्रवृत्त केले जाणार आहे. सुमारे चार लाख वृक्ष लागवडीचे नियोजन राहणार आहे. जैन ग्रृप दीड लाख फळ रोपे देणार असल्याची माहितीही डॉ.कलशेट्टी यांनी दिली.
दरम्यान, वन विभागातर्फे लावण्यात आलेल्या 10 लाख 33 हजार वृक्षांपैकी 10 लाख 12 हजार वृक्ष जगली असल्याचेही त्यांनी सांगितले.