125 जादा बसफे:यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:14 AM2017-08-21T11:14:31+5:302017-08-21T11:15:07+5:30
गौरी-गणपती उत्सव : टोलचा भरुदड मात्र सोसावा लागणार
न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गौरी-गणपतींच्या काळादरम्यान एसटी महामंडळाकडून 125 जादा बसफे:यांचे नियोजन आह़े एसटी बसेसना टोलमाफी देण्यात यावी या धुळे विभागाच्या विनंतीला संबंधित विभागाकडून नकार देण्यात आला आह़े
याबाबत धुळे विभागाकडून संबंधित प्रशासनाला पत्र देण्यात आले होत़े यात गौरी-गणपतींसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आलेल्या जादा बसेसना टोलमाफी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती़ परंतु याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े
येत्या काळातील गौरी-गणपतीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील विविध आगारांकडून जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े याबाबत आगर व्यवस्थापकांना धुळे विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून 22 ऑगस्टपासून या बसेस टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आह़े
25 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आह़े यानिमित्त मोठय़ा संख्येने चाकरमानी मुंबई तसेच कोकणात जात असतात़ त्यानिमित्त जादा भारमानाची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात येत आह़े
25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े यानुसार, धुळे आगाराकडून 20 बसेस बोरीवली बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार आह़े तसेच साक्री आगार 15 तर दोंडाईचा आगारातील 10 बसेस भाईंदर बसस्थानकापर्यत सोडण्यात येणार आह़े तसेच नंदुरबार आगाराकडून 15, शहादा आगाराकडून 17 बसेस, शिरपूर आगाराकडून 17 बसेस , नवापूर आगाराकडून 11 बसेस ,शिंदखेडा आगाराकडून 10 बसेस, अक्कलकुवा आगाराकडून 10 बसेस भिवंडी बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ अशा प्रकारे एकूण 125 बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े
बसेस रिकाम्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी
जादा वाहतुकीसाठी पाठविण्यात येणा:या बसेस कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या जाणार नाही तसेच परतीच्या वेळीही रिकाम्या येणार नाहीत याची दक्षता संबंधित आगार व्ययवस्थापकांनी घ्यायची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आह़े 25 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी, 30 ऑगस्ट गौरी पुजन, 31 ऑगस्ट गौरी विसजर्न, पाच सप्टेंबर अनंत चतुर्दशी आदी महत्वाच्या दिवसांसाठी विभागाकडून बसेसची विशेष तरतुद करण्यात आली़
एसटी महामंडळासमोर खाजगी वाहनाची समस्या कायम
दरम्यान, धुळे विभागाकडून जादा बससेची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असली तरीदेखील महामंडळासमोर खाजगी वाहतुकीची समस्या कायम आह़े प्रवाशांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत असतो़ महामंडळाकडून जादा बससेवा देण्यात येत असल्या तरीदेखील प्रवासी खाजगी वाहनांचाच वापर करीत असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े त्यामुळे कमी भारमानामुळे एसटी बसेसच्या फे:या तोटय़ात सापडत असतात़ त्यामुळे तोटय़ात असल्यावरही त्यांना बसफे:या कायम ठेवाव्या लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, जादा बसफे:यांसाठी सुमारे दीडशे चालक व वाहकांचे नियोजन आगाराकडून करण्यात आले आह़े बसेसची दुरुस्ती करुन चांगल्या अवस्थेत असलेल्या बसेसच वाहतुकीसाठी वापराव्यात, कंत्राटीपध्दतीने चालक किंवा वाहकांची व्यवस्था करु नये अशा सूचना धुळे विभागाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत़