‘अवघड क्षेत्रा’मधून गावे वगळल्याने 125 शिक्षक संकटात
By Admin | Published: April 27, 2017 06:19 PM2017-04-27T18:19:40+5:302017-04-27T18:19:40+5:30
धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील काही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े
ऑनलाइन लोकमत
अक्कलकुवा, जि. नंदुरबार, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी शासनाने शिक्षक बदल्यांमध्ये अवघड क्षेत्र म्हणून निर्धारित केलेल्या धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील काही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यामुळे 125 शिक्षक टांगणीला लागले असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आह़े
दोन्ही तालुक्यातील काही गावे अवघड क्षेत्रातून वगळण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवघड क्षेत्रातून गावे वगळून तेथील शैक्षणिक प्रगतीवर बंधने आणण्याचा हा प्रयत्न आह़े अक्कलकुवा तालुका हा अतीदुर्गम भाग असल्यामुळे अनेकवेळा शिक्षक वर्गाचे हाल होत असतात़ तालुक्यातील काही द:याखो:यातील गावांकडे जाण्याचा रस्ता, वीज नाही़ याठिकाणी ज्ञानदानाचे अनमोल कार्य करण्यासाठी जाणा:या शिक्षकांना असंख्य संकटांना तोंड द्यावे लागत़े त्यामुळे त्यांच्या बदल्यांबाबत अवघड आणि साधारण अशी केलेली क्षेत्र विभागणी योग्य आह़े सर्वसाधारण सभेत दोन्ही तालुक्यातील काही गावे वगळण्याबाबत घेण्यात येणारा निर्णय हा पूर्ण विचाराअंती घेतलेला नसल्याने त्यावर फेरविचार करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आह़े
तालुक्यातील 125 शिक्षकांच्या या समस्येवर मार्ग न काढल्यास येत्या काळात शिवसेना पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी दिला आह़े ग्रामविकास विभागाने धडगाव आणि अक्कलकुवा हे दोन तालुके 100 टक्के अवघड क्षेत्रात समाविष्ट केले होत़े सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊन शहरी भाग तसेच रस्त्यालगतची मोठी गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता़