हातोडा पाणीपुरवठय़ासाठी 13 कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:45 PM2018-10-17T12:45:34+5:302018-10-17T12:45:43+5:30

तळोदा पालिका : कचरा संकलनासाठी चार घंटा गाडय़ांचे लोकार्पण

13 crores for hammer water supply | हातोडा पाणीपुरवठय़ासाठी 13 कोटींचा प्रस्ताव

हातोडा पाणीपुरवठय़ासाठी 13 कोटींचा प्रस्ताव

Next

तळोदा : शहरातील हातोडा पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव कामांसाठी पालिकेने पुन्हा शासनाकडे 13 कोटींचा प्रस्ताव पाठविला असून, त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी कार्यक्रमात दिली. येथील पालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी सहा घंटागाडय़ा खरेदी केल्या आहेत. या गाडय़ांचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते.
व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, आरोग्य सभापती सुनयना उदासी, महिला व बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, बांधकाम सभापती भास्कर मराठे, नगरसेवक रामा ठाकरे, सुरेश पाडवी, अमानुद्दीन शेख, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र सूर्यवंशी, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, अनिता परदेशी, प्रतिक्षा ठाकूर, बेबीबाई पाडवी, अनिताबाई पाडवी, कल्पनाबाई पाडवी, शोभाबाई भोई, योगेश चौधरी, संदीप परदेशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, योगेश मराठे, राजेंद्र राजपूत उपस्थित होते. 
या वेळी परदेशी यांनी शहरातील हातोडा पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती देतांना सांगितले की, या योजनेच्या वाढीव कामांसाठी गेल्या महिन्यातच पालिकेमार्फत साधारण 13 कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविला आहे. यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावादेखील सुरू असून, मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच हा निधी प्राप्त होणार आहे. यातून तापीनदीवर आधुनिक पद्धतीचा ज्ॉकवेल बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यात गाळही साचणार नाही. याशिवाय शहरातील नवीन वसाहतींबरोबरच सर्व भागातील नवीन जलवाहिन्या टाकण्यात येईल. 
सध्याच्या जलवाहिन्यांमध्ये प्रचंड क्षार व ब्लिचींग पावडर साचल्यामुळे पाणीपुरवठय़ातही बाधा येत आहे. या योजनेमुळे शहराचा पाणी प्रश्न कायमचा दूर होणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. या वेळी त्यांनी शहरातील स्वच्छताबाबत पालिका ठोस उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिक, व्यापा:यांनीही कचरा संकलनासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र माळी, गणेश ठाकूर, अभियंता एस.एम. गावीत, मोहन माळी, अश्विन परदेशी आदींसह कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: 13 crores for hammer water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.