पोलिसांच्या युथ पार्लमेंट स्पर्धेत 13 संघ सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:08 PM2018-03-31T12:08:17+5:302018-03-31T12:11:40+5:30

13 teams participating in Police Youth Parliament Competition | पोलिसांच्या युथ पार्लमेंट स्पर्धेत 13 संघ सहभागी

पोलिसांच्या युथ पार्लमेंट स्पर्धेत 13 संघ सहभागी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात शाळा महाविद्यालयात पोलीस महासंचालक युथ पार्लमेंट वक्तृत्व स्पर्धा-2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े स्पर्धेवर शहादा येथील विकास हायस्कूलच्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केल़े 
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे उपस्थित होत़े स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे, प्रा़ माधव कदम, प्रा़ श्रीराम दाऊतखाने यांनी केल़े यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांनी स्पर्धा आयोजनाचा मूळ हेतू स्पष्ट केला़ स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील 13 संघांनी सहभागी घेतला़ यात निवड झालेल्या प्रथम आणि द्वितीय संघाची नाशिक येथे होणा:या परिश्रेत्रीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली़ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनात या ह्या स्पर्धा घेण्यात आल्या़ 
आठवी ते 12 वीच्या विद्याथ्र्यासाठी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले होत़े दहशतवाद, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, शैक्षणिक दबावातून विद्यार्थी आत्महत्या, सोशल मिडियाचा दुरूपयोग, जातीयवाद, वामपंथी उग्रवाद, सांप्रदायिकता, आर्थिक गुन्हेगारी, मादक द्रव्यांचे सेवन, मानवी तस्करी, वाहतूक अनुपालक, दुष्काळ व त्याचे सुव्यस्थेवरील परिणाम, औद्योगिक व इतर बंद अशा विविध विषयांवर विद्याथ्र्यानी परखडपणे मते नोंदवत भाष्य केल़े 
स्पर्धेत शेठ व्हि़क़ेशाह विद्यामंदिर शहादा (उत्कृष्ट संघ-प्रथम), श्रॉफ हायस्कूल व अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु कॉलेज, नंदुरबार (द्वितीय-उत्कृष्ट संघ), प्रथम उत्कृष्ट वक्ता अरशान मजीद खान पठाण-अँग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबार, उत्कृष्ट स्पीकर द्वितीय करिना मेरसिंग पावरा, चावरा इंग्लिश मेडियम स्कूल नंदुरबार, उत्कृष्ट स्पीकर तृतीय कुमुदिनी अजित लांडगे-एकलव्य विद्यालय, नंदुरबार यांना पारितोषिके देण्यात आली़
स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या तीन उत्कृष्ट वक्त्यांना पारितोषिक देण्यात आल़े प्रथम दोन संघांना फिरती ढाल तर उत्कृष्ट वक्त्यांना जिल्हाधिकारी यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला़ विजेत्यांचे पोलीस दलाकडून कौतूक करण्यात आल़े यशस्वीतेसाठी पोलीस उपअधिक्षक विजय सोनवणे, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, विनोद जाधव, पोलीस नाईक नरेंद्र पाटील, गोपाल चौधरी, प्रमोद सोनवणे, जितेंद्र अहिरराव, भटू धनगर, राहुल भामरे, किरण मोरे, पंकज महाले, जितेंद्र ठाकूर यांनी परिश्रम घेतल़े कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े 

Web Title: 13 teams participating in Police Youth Parliament Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.