कर्जमुक्तीसाठी १३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:01 PM2017-08-23T19:01:42+5:302017-08-23T19:03:07+5:30
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची बँकाकडून होणार चौकशी
आॅनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.२३ - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील १३ हजार ६९७ शेतकºयांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आॅनलाईन अर्ज भरून दिले आहेत़ या अर्जांची चौकशी करून त्यांना पुढील लाभ मिळणार आहेत़
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे गेल्या वर्षी १९ शेतकºयांना पीककर्ज वाटप केले होते़ त्यातील साडेतीन हजार शेतकºयांना कर्ज भरणा केला होता़ तर १५ हजार शेतकरी थकबाकीदार होते़ शासनाने नुकतीच कर्जमाफीची घोषणा करून सन्मान योजना सुरू केली आहे़ याअंतर्गत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आदेश होते़ त्यात जिल्ह्यातील १३ हजार शेतकºयांनी सहभाग दिला आहे़ या आॅनलाईन अर्जांची राष्ट्रीकृत बँका चौकशी करणार असून त्याचा अहवाल १५ सप्टेंबरपर्यंत सहकार विभागाला देणार आहेत़ यात दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकºयांना तात्काळ कर्जमुक्त करण्यात येणार आहे़ तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांनी दीड लाखावरील कर्जाचा भरणा केल्यानंतर त्यांचे कर्ज माफ केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या सर्व ३१ शाखांमधून हे आॅनलाईन भरणा करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कर्जमाफीची अपेक्षा असलेल्या शेतकºयांनी यापूर्वीही तात्काळ अर्ज आणि शपथपत्रे भरून दिली होती़ त्यानंतर आॅनलाईनचे कामकाजही पूर्ण केल्याने आता प्रत्यक्ष कर्जमाफी होऊन सातबारावरचा बोजा कधी कमी होणार याकडे लक्ष लागून आहे़