13 वर्षानंतर आले ‘नाला’ प्रकल्पात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:51 PM2019-08-04T13:51:22+5:302019-08-04T13:54:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  न्याहली : नंदुरबार तालुक्यातील अवर्षणग्रस्त अशा पूर्व भागातील शेतक:यांच्या शेतांचे सिंचन होऊन जलसंधारण व्हावे यासाठी 2001 ...

13 years later water came in the 'Nala' project | 13 वर्षानंतर आले ‘नाला’ प्रकल्पात पाणी

13 वर्षानंतर आले ‘नाला’ प्रकल्पात पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
न्याहली : नंदुरबार तालुक्यातील अवर्षणग्रस्त अशा पूर्व भागातील शेतक:यांच्या शेतांचे सिंचन होऊन जलसंधारण व्हावे यासाठी 2001 सालापासून उभारण्यात आलेल्या अमरावती नाला प्रकल्पात 13 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर पाणीसाठा झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदलहर दौडू लागली आह़े तूर्तास प्रकल्पात 15 टक्के पाणीसाठा झाला असून पाण्याअभावी कोरडय़ाठाक असलेल्या या प्रकल्पात उगवलेली काटेरी झुडपे पाण्याखाली जात असल्याचे अनोखे दृश्य येथे नजरेस पडत आह़े 
पूर्व भागातील बलदाणे, न्याहली, आसाणे, खोक्राळे यासह विविध गावांमध्ये सिंचन व्हावे याउद्देशाने अमरावती नाला प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती़ निर्मितीनंतर 2004 ते 2006 या काळात या प्रकल्पात 2़90 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता़ कालांतराने पावसाने या भागात हजेरी न लावल्याने हा साठा कमी होत जाऊन 2011 उजाडेर्पयत प्रकल्पपूर्णपणे कोरडा ठाक पडला होता़ पावसाळ्यात तळे साचत असल्याचे दिसून येत होत़े यातून जलसंधारणाचा मुख्य उद्देश अपूर्ण राहिला होता़ विविध प्रयत्न करुन हा प्रकल्प भरण्याचा प्रयोग राबवला गेला़ परंतू प्रकल्पात साठाच होत नव्हता़ सध्या सुरु असलेल्या तापी-बुराई उपसा सिंचन योजनेत हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असे सांगण्यात आल्यानंतर न्याहली व बलदाणे येथील शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत होता़ परंतू उपसा सिंचन योजनेचे काम संथगतीने सुरु असल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार कधी असा प्रश्न होता़ दरम्यान पावसाळा सुरु झाल्यानंतर अमरावती नदीला पाणी येऊन शनिमांडळ येथील तलाव आणि बंधारा भरले गेल्यानंतर पुराचे पाणी येथे आल्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा होण्यास प्रारंभ होत आह़े या पाण्यामुळे लगतच्या तीन गावांचा पिण्याचा प्रश्न येत्या वर्षभरापुरता निकाली लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली आह़े पावसाने साथ दिल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े गत 15 दिवसांपासून पूर्व भागातील गावांमध्ये पावसाची स्थिती चांगली असल्याने शेतक:यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आह़े प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास या रब्बी हंगामही चांगला जाणार आह़े  
 

Web Title: 13 years later water came in the 'Nala' project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.