जिल्ह्यासाठी आला एक हजार ४०० टन युरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:56 AM2020-07-07T11:56:32+5:302020-07-07T11:56:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील युरिया टंचाईची स्थिती कायम आहे़ सोमवारी दोंडाईचा येथून जिल्ह्याच्या वाट्याला केवळ १ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील युरिया टंचाईची स्थिती कायम आहे़ सोमवारी दोंडाईचा येथून जिल्ह्याच्या वाट्याला केवळ १ हजार ४०० टन युरिया पाठवण्यात आला आहे़
युरिया उत्पादक कंपन्यांकडून सोमवारी जिल्ह्यासाठी किमान २ दोन रॅकमध्ये २९ हजार टन युरिया पाठवला जाईल अशी माहिती देण्यात आली होती़ प्रत्यक्षात दोंडाईचा येथे रॅक दाखल झाल्यानंतर त्यातून युरियाच्या गोण्या काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी मजूर नसल्याने केवळ १ हजार ४०० टन युरियाच पाठवता असल्याची माहिती देण्यात आली आहे़ मंगळवार ते गुरुवार या काळात आणखी तीन युरिया कंपन्यांकडून पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ दुसरीकडे सोमवारी युरियाच्या खरेदीसाठी नंदुरबार शहरातील कृषी सेवा केंद्रांबाहेर शेतकऱ्यांसह महिलांच्याही रांगा लागल्या होत्या़ यातील मोजक्याच जणांना युरिया मिळू शकल्याचे सांगण्यात आले आहे़