नंदुरबारातील 14 हजार शेतकरी पिक विमा योजनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:45 PM2018-02-17T12:45:40+5:302018-02-17T12:45:57+5:30

14,000 farmers of Nandurbar under Peak Insurance scheme | नंदुरबारातील 14 हजार शेतकरी पिक विमा योजनेत

नंदुरबारातील 14 हजार शेतकरी पिक विमा योजनेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 14 हजार शेतक:यांनी नोंदणी केलेल्या विमा योजनेचे सव्रेक्षण सुरू झाले असून यातून येत्या काळात शेतक:यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़
नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात बोगस बियाणे, बोंडअळी, अल्प पजर्न्यामुळे नापिकी यात घेरल्या गेलेल्या शेतक:यांना उत्पादनात फटका बसला होता़ शासनाने पंचनामे केल्यानंतरही शेतक:यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही़ यात आता विमा कंपन्यांकडून शेतक:यांनी केलेल्या विम्याचे सव्रेक्षण सुरू केले आह़े विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतशिवारात फिरून सात वर्षातील उत्पादन, पाच वर्षात झालेले नुकसान आणि वाढीव उत्पादन यांचे सव्रेक्षण करत आहेत़ गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीची मार बसल्याने बहुतांश शेतक:यांना नुकसानच झाल्याचे स्पष्ट होत असल्याने पिकांना विम्याची रक्कम मिळण्याचे आसार आहेत़ नैसर्गिक आपत्तीसह इतर निकषांना जिल्ह्यातील शेतक:यांची पिके पात्र ठरत असल्याने हेक्टरी सात हजार किंवा त्यापेक्षा अधिक विमा रक्कम मिळण्याची शक्यता आह़े विमा कंपन्यांकडून वर्ग करण्यात आलेल्या अहवालानंतर येत्या जूनर्पयत शेतक:यांना विम्याची रक्कम मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील शेतक:यांना 2015-16 यावर्षात 34 कोटी रूपयांचा विमा परतावा शेतक:यांना मिळाला होता़ यंदा विम्यासाठी जिल्ह्यातील 14 हजार 717 शेतक:यांनी अर्ज केले होत़े हे सर्वच अर्ज विमा कंपन्यांनी ग्राह्य धरून कामकाजाला सुरूवात केली आह़े विशेष म्हणजे या विमा संरक्षणात बोंडअळीमुळे नुकसान झालेला कापूस आणि बोगस बियाण्यामुळे शेतक:यांच्या हातून गेलेली ज्वारीचाही समाविष्ट करण्यात आल्याची माहिती आह़े या पिकांना विमा कंपनीच्या निकषानुसार संरक्षण मिळाल्यास शेतक:यांची सर्वात मोठी समस्या दूर होऊन त्यांच्या नुकसानीची भरपाई होणार आह़े विमा कंपन्यांकडून सध्या शेतक:यांची प्राथमिक स्तरावर चौकशी सुरू आह़े जिल्हा बँकेच्या नंदुरबार जिल्ह्यातील 31 शाखांमधून 521 सभासदांना 20 लाख 17 हजार रूपयांची विमा रक्कम गतवर्षी देण्यात आली होती़ यंदा जिल्हा बँकेत कजर्माफीच्या अजर्सोबतच विमा अजर्ही शेतक:यांकडून भरून घेण्यात आल्याने विमालाभधारक शेतक:यांची संख्या वाढण्याची शक्यता आह़े बँकेच्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांना विमा मिळून हातभार लागणार आह़े

Web Title: 14,000 farmers of Nandurbar under Peak Insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.