143 कारखाने धोकेदायक श्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:03 AM2019-06-05T11:03:13+5:302019-06-05T11:03:22+5:30
जागतिक पर्यावरण दिन लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोठय़ा उद्योगांची वानवा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण 439 छोटेमोठे उद्योग आहेत़ ...
जागतिक
पर्यावरण दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोठय़ा उद्योगांची वानवा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण 439 छोटेमोठे उद्योग आहेत़ या उद्योगांच्या तपासण्या गेल्या 10 वर्षात पूर्णपणे रखडल्या असून प्रदूषण नियंत्रण मंडळही नावालाच भेटी देत असल्याने कारखान्यांचे सांडपाणी आणि त्यातून होणा:या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आह़े
जिल्हानिर्मितीनंतर येथे मोठे उद्योग येऊन भरभराट होईल अशी अपेक्षा होती़ परंतू गत 20 वर्षात जे कारखाने सुरु आहेत़ त्यातून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे समोर आले आह़े बहुतांश उद्योग हे छोटय़ा स्केलवर चालवले जात असले तरी त्यातून सोडले जाणारे सांडपाणी आणि वायू यामुळे प्रदूषण होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर आले आह़े जिल्ह्यात एकूण उद्योगांपैकी 143 उद्योग हे रेड झोनमध्ये आहेत़ यात अक्कलकुवा 1, तळोदा 1, शहादा 51, नंदुरबार 62 तर नवापूर तालुक्यात 28 उद्योग आहेत़ प्लास्टिकपासून विविध साधने तयार करण्यासाठी रासायनिक उद्योगांच्या या फॅक्टरांच्या तपासण्या करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथे 20 वर्षात अधिकारीच नियुक्त केलेला नसल्याने या कारखान्यांच्या पाईपांमधून नदी-नाल्यात दिवसढवळ्या सांडपाणी सोडले जात असल्याची स्थिती आह़े यातून अनेक नाले जलप्रदूषणाचे स्त्रोत बनले आहेत़
शासनाने निर्धारीत बंदी घातलेल्या व प्रदूषणास धोकेदायक ठरणा:या प्लास्टिकच्या पिशव्यांचा शहरी भागात सर्रास वापर होतो़़ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांनी केवळ तीन वेळा नंदुरबार पालिकेच्या सहाकार्याने पिशव्या जप्त केल्या़ त्यानंतर मात्र कारवाई झालेली नाही़ शहादा शहरातही बंदी असलेल्या पिशव्या नागरिकांना विक्रेते सहज देत असल्याचे सातत्याने दिसून आले आह़े
नंदुरबार जिल्ह्यात साखर हंगामात पुरुषोत्तमनगर ता़ शहादा, डोकारे ता़ नवापूर येथे सहकारी तर समशेरपूर ता़ नंदुरबार येथे खाजगी तत्त्वावर साखर कारखाना चालवण्यात येतो़ या कारखान्यांची वार्षिक तपासणी धुळे येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून करण्यात येत़े कारखान्याच्या चिमणीतून सोडण्यात येणा:या धुरामुळे अधिकचे प्रदूषण होऊ नये, यासाठी तिन्ही कारखान्यात धूर सोडतेवेळी धुरांडय़ात पाणी सोडण्यात येत़े यामुळे वातावरणाला हानी पोहोचवणारे घटक कमी होऊन धूर बाहेर पडतो़ तिन्ही कारखान्यांनी पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आह़े तसेच याठिकाणी मळीपासून इथेनॉलचीही निर्मिती होत़े