चावडी वाचनात आल्या 143 हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:18 PM2017-10-10T12:18:24+5:302017-10-10T12:18:24+5:30

शेतकरी कजर्माफी अर्ज : निवडणुकीमुळे 52 गावात वाचन रखडले

 143 objections came in the reading | चावडी वाचनात आल्या 143 हरकती

चावडी वाचनात आल्या 143 हरकती

Next
ठळक मुद्देअर्जाचे तीन याद्यांमध्ये वर्गीकरण.. कर्ज माफीचे अर्ज दाखल केलेल्या एकुण अर्जाचे तीन याद्यांमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यात पहिली यादी ही ग्रीन यादी राहणार आहे. या यादीत सर्व कागदपत्र आणि माहिती परिपुर्ण असेल अशा अर्जाचा समावेश राहणार आहे. या यादीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्रामपंचायतीची आचारसंहिता असलेल्या 52 ग्रामपंचायती वगळता इतर सर्व ठिकाणी शेतकरी कर्ज माफीच्या अर्जाचे चावडी वाचन करण्यात आले आहे. त्यातून 143 हरकती आल्या असून 52 ग्रामपंचायतीत येत्या दोन दिवसात चावडी वाचन केले जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील कामात जिल्हा राज्यात तिस:या क्रमांकावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शेतकरी कर्ज माफीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर्पयत होती. त्या मुदतीत जिल्ह्यातील 47 हजार 590 शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्या अर्जाच्या छाननी आणि पडताळणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे काही गावांमध्ये चावडी वाचन होऊ शकले नव्हते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील अंतिम आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेलीे नाही. परंतु ज्या ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचन  झाले तेथे काही हरकती घेण्यात आल्या.
आचारसंहितेमुळे विलंब
जिल्ह्यातील अर्जाची छाननी आणि पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतार्पयत ते काम देखील पुर्ण झाले असते, परंतु ग्रामपंचायत निवडणुका सुरू असल्यामुळे अशा ठिकाणी आचारसंहितेच्या कारणावरून शेतक:यांच्या अर्जाचे चावडी वाचन होऊ शकले नव्हते. अशा एकुण 52 ग्रामपंचायतींमध्ये आता मंगळवारपासून चावडी वाचनाला सुरुवात करण्यात येणार आहे. 
येत्या दोन दिवसात ते काम पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी दिली.
आणखी हरकती येणार..
ज्या ठिकाणी चावडी वाचन झाले त्या ठिकाणाहून एकुण 143 हरकती घेण्यात आलेल्या आहेत. हरकतींमध्ये नाव नसणे, नाव बदल, कागदपत्रांची पुर्तता, कर्ज रक्कम यासह इतर बाबींवर हरकती घेण्यात आलेल्या आहेत. या हरकतींवर तालुकास्तरीय समिती निपटारा करणार आहे.
याशिवाय राज्यस्तरावरून आणखी काही बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यात     सरकारी, निमसरकारी नोकरदार मंडळी, लोकप्रतिनिधी आणि   आयकर भरणा:या शेतक:यांचा समावेश राहणार आहे. असे शेतकरी या योजनेतून बाद केले जाणार  आहेत.
कारवाईची शक्यता
ऑनलाईन अर्ज भरतांना विविध बँकाकडून घेतलेल्या कर्जाची    माहिती दिली नाही अशा   शेतक:यांवर नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. त्यामुळे ज्या शेतक:यांनी त्यांच्याकडे असलेल्या विविध बँकांच्या कर्जाची माहिती अपलोड करावी. 
अर्ज  भरतांना ज्यांनी आधारकार्ड जोडले नसेल त्यांनी आधार कार्डची ङोरॉक्स प्रत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा करावी असे आवाहन करण्यात आले होते.
शेतकरी कजर्मुक्ती योजनेत सर्वाधिक शहादा तालुक्यातील शेतक:यांनी अर्ज केले आहेत. या तालुक्यातील खातेदार शेतक:यांची संख्या जवळपास 25 हजारापेक्षा अधिक आहे. त्यातील 15 हजार    826 शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्याखालोखाल नंदुरबार तालुक्यातील 13 हजार 947 शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी अर्ज भरले. सर्वात कमी अर्थात अक्कलकुवा तालुक्यातून केवळ तीन हजार 255 जणांन अर्ज भरले आहेत.

Web Title:  143 objections came in the reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.