शहादा उपविभागातील 148 गावांमध्ये पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:15 PM2018-03-15T12:15:10+5:302018-03-15T12:15:10+5:30

पोलीस पाटील : पेसांतर्गत गावांचाही समावेश; शहादा उपविभागातील गावे

In the 148 villages of Shahada subdivision, leaving the reservation for the post of Police Patil | शहादा उपविभागातील 148 गावांमध्ये पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत

शहादा उपविभागातील 148 गावांमध्ये पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : शहादा उपविभागअंतर्गत असलेल्या शहादा व धडगाव तालुक्यातील  148 गावातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण बुधवारी काढण्यात आले. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या उपस्थितीत लहाण मुलांचा हाताने चिठ्ठी काढून पोलीस पाटील पदांचे आरक्षण काढण्यात आले. 
येथील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये शहादा व धडगाव तालुक्यातील 148 गावांचे पोलीस पाटील पदांचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, धडगाव तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार डॉ़ उल्हास देवरे, विजय गौस्वामी, नरेश सौदाणे,  किशोर भादुर्ग, आनंद शिरसाठ, योगेश शिरसाठ आदी उपस्थित होते. 
आरक्षणात पैसा क्षेत्राबाहेरील 21 व पैसा क्षेत्राअंतर्गत  127 गावांचा समावेश आहे.  समांतर आरक्षणानुसार 30 टक्के जागा महिलासांठी राखीव ठेवण्यात आल्या ओत़ तसेच 38 गावांचा  पोलीस पाटील पदांचा पदभार महिलांकडे येणार असल्याने या क्षेत्रातही ‘महिलाराज’ असल्याचे म्हटले जात आहे.   
अनुसूचित जातीसाठी भडगाव, कुरावद त. स, मोईदे त.श., टेभे त.श. तसेच अनुसुचित जमातीसाठी जिवननगर . विमुक्तजाती डामरखेडा. भटक्या जमाती कुकावल़ इतर मागासवर्गासाठी अनंरद, कळंबु, फेस़ खुल्या प्रवर्गात हिगणी, सोनवद त श., नादंरखेडा, लाबोळा, मनरद, शेल्टी, सावळदा, कानडी त श., कौठळ त सा., पळासखेडा व शोभानगर या गावांचा समावेश आह़े  हे सर्व गावे पेसाक्षेत्राबाहेरील आहे.  यातील टेभे त श., फेस, सोनवद त श., सावळदा व कानडी ही पाच गावे महिलांसाठी आरक्षित आहे. 
पेसाअंतर्गत शहादा तालुक्यातील बोराळा,बोधिपुर, दामळदा, कानडी त ह., प्रिपी, तराडी त बो, बुपकरी, दरा, भागापुर, उजोळोद, जयनगर, मानमोडय़ा, वाघोदे, शाहाना, ओरगंपुर, डोगरगाव,  जुनवने, गोगापुर, निभोरा, नादरडा, वैजाली, कुसुमवाडे, टुकी, न्यु असलोद, चिरडे, चिखली खुर्द, बोरटेक, धाद्रे, कलमाडी त ह., प्रिप्राणी, मंदाना, वर्धा, खेडदिगर, वाघर्ड,  परी, प्रिपरडे, दुरखेडा, कोठली त ह., माटकुट, पाडळदा, मोहिदा त ह., चादसैली, भोगरा, वडछिल, कौठल त श., नवानगर, सुलवाडे, तिखोरा, राणीपुर, सोनवल त बो., शिरूड त ह., अलखेड, मुबारकपुर, उखडशेम, नांदे, कलमाडी, कुरंगी, इस्लामपूर,  खापरखेडा, जावदे त  ह, चांदसैली, नागझीरी, होळ, लाछोरे, होळगुजरी, टवळाई, जावदे त बो., काथर्दा खुर्द, या 69 गावांचे आरक्षण काढण्यात आले.  
 धडगाव तालुक्यातील  वडफळ्या, चौदवाडे खुर्द,  बिलबार पाडा, सोमाने, राडीकलम, मनखेडी बुद्रुक, मोख खुर्द, तिनसमाळ, घाटली, बोगवाडे खुर्द, काकरपाटी, खाडबारा, बुजगाव, चिप्पल, चित्तार फॉ, मनवानी खुर्द,  खुगवान, अस्तांबा फॉ, रामसला, टेभेला, वरखेडी बुदूक,  हातदुही, भानोली, कुडंल, सोन बुद्रुक, सोन खुर्द,  सिसा, उमरानी खुर्द, सुरवाणी, खडक्या, चौडवाडे बुद्रुक,  रोषमाळ,  धनाजे बुदूक,  बोगवाडे बुदूक,  खरवड, आबांरी, पाडली, अंस्ताभा रे, वैली आबा, उखडी आंबा,  कुकस्तार, निमगवान, दुट्टल, सुरंग, नळगवान, बोरसिसा, खुड्या, भादल, उडद्या, जुगनी, वेलखेडी, केलापाणी, मोडलगाव, गोरबां,झापी, कात्री, फॉरेस्ट, जलोला व चित्तारे अशा  58 गावांचे आरक्षण काढण्यात   आले.  
30 टक्के आरक्षणानुसार या दोन्ही तालुक्यातील  पेसाक्षेत्राअंतर्गत प्रिपी, दरा, भागापुर, मानमोडय़ा, वाघोडे, ओरंगपुर, जुनवणे, निभोरे, वैजाली, कुसुमवाडे, बोरटेक, धाद्रे, वर्धा, परी, दुरखेडा, पाडळदा, चादसैली , कोठळ त स. अलखेड, कुरगी, लाछोरे तर, शहादा तालुका आणि सोमाने राडी कलम, घाटली, काकरपाटी, खाडबारा, खुश जवान, रामसला, हातधुई, उणरानी खुर्द, पाडली, कुकतार, दुट्टलल, उडद्या , कैलापाणी, गोरबा, कात्री व चित्तारे ही 33 गावे महिलांसाठी आरक्षीत झाली आहे. शहादा उपविभागीतील 148 गावांचे पोलीस पाटील पद रिक्त होती. यातील 21 पेसाबाहेरील व 127 पेसाअंतर्गत आहेत. 
 

Web Title: In the 148 villages of Shahada subdivision, leaving the reservation for the post of Police Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.