पंपांमध्ये 17 लाख लीटर पेट्रोल आणि डिङोल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:47 PM2020-04-17T12:47:48+5:302020-04-17T12:47:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरुन कायद्याचे उल्लंघन करणा:या उत्साहींना आवर घालण्यासाठी प्रशासनाने पेट्राल आणि डिङोलची विक्री ...

17 lakh liters of petrol and dingol fall into the pumps | पंपांमध्ये 17 लाख लीटर पेट्रोल आणि डिङोल पडून

पंपांमध्ये 17 लाख लीटर पेट्रोल आणि डिङोल पडून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरुन कायद्याचे उल्लंघन करणा:या उत्साहींना आवर घालण्यासाठी प्रशासनाने पेट्राल आणि डिङोलची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला होता़ यामुळे पेट्रोल आणि डिङोलच्या विक्रीत मोठी घट आली असून जिल्ह्यातील पंपांमध्ये तब्बल सहा लाख 2 हजार लीटर पेट्रोल आणि 11 लाख लीटर डिङोल शिल्लक आह़े 
 जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी शहरी भागात पेट्रोल आणि डिङोल विक्री बंद करण्याचे आदेश काढले होत़े केवळ अत्यावश्यक सेवा आणि नियमित सेवा बजावणा:यांना पेट्रोल आणि डिङोल विक्री करण्याचे सांगण्यात आले होत़े यानुसार जिल्ह्यातील चार पालिका आणि 1 नगरपंचायत हद्दीसह अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पाच विविध कंपन्यांच्या 100 च्या जवळपास पेट्रोलपंपांवर अधिकृत अधिका:यांनी दिलेली पास दाखवल्याशिवाय पेट्रोल व डिङोल विक्री केली जात नाही़ यामुळे दर दिवशी किमान 40 हजार लीटर होणारी पेट्रोल आणि 60 हजार लीटर डिङोलची सरासरी विक्री बंद झाली आह़े यातून त्या-त्या पालिकां, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीचा महसूल बुडत आह़े आजअखेरीस दिवसभरात जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सरासरी 4 हजार लीटर पेट्रोल आणि सहा हजार लीटर डिङोलची विक्री होत असल्याची माहिती देण्यात आली आह़े पेट्रोल डिङोलची विक्री थांबली असल्याने अनावश्यक वाहनेही रस्त्यांवर धावत नसल्याचे चित्र दिसून येत आह़े प्रशासनाकडून दर दिवशी पेट्रोल आणि डिङोलच्या विक्रीचा आढावा घेत पेट्रोलपंप चालकांना सूचना केल्या जात आहेत़ जिल्ह्यात एचपीसीएल अर्था हिंदुस्तान पेट्रोलियमच्य नंदुरबार, नवापुर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील पंपांमध्ये 1 लाख 15 हजार 300 लीटर, बीपीसीएलच्या पंपांमध्ये 1 लाख 95 हजार, आयओसीएलच्या पंपांवर 2 लाख 32 हजार 600 लीटर पेट्रोल शिल्लक आह़े शहादा आणि नवापुर येथील रिलायन्सच्या पंपांमध्ये 3 हजार 800, नंदुरबार, शहादा आणि अक्कलकुवा येथील एस्सारच्या पंपावर 2 हजार 100 लीटर पेट्रोल आजअखेरीस पडून आहेत़ नंदुरबार तालुक्यात 1 लाख 54 हजार, नवापुर 1 लाख 13 हजार 300, शहादा 2 लाख 16 हजार, तळोदा 60 हजार, अक्कलकुवा येथे 40 हजार 600 तर धडगाव तालुक्यात 12 हजार 200 असे एकूण 6 लाख 2 हजार लीटर पेट्रोल शिल्लक आह़े 
अत्यावश्यक सेवेत डिङोलचा प्रारंभीच समावेश आह़े जिल्ह्यात सरासरी दिवसभरात 60 हजार लीटरपेक्षा अधिक इंधनाची विक्री होत असल्याने वेळोवेळी डिङोल आवक करुन घेतली जात़े मनमाड (पानेवाडी) येथील डेपोमधून येणारे डिङोल जिल्ह्यात पाच कंपन्यांच्या पंपांवरुन वितरीत होत़े याशिवाय नव्याने सुरु झालेल्या बायोडिङोल पंपांचाही यात समावेश आह़े आजअखेरीस जिल्ह्यात 11 लाख 37 हजार 500 लीटर डिङोल पडून आह़े 
नंदुरबार तालुक्यात 1 लाख 56 हजार 600, नवापुर 3 लाख 67 हजार 900, शहादा 3 लाख 48 हजार 800, तळोदा 1 लाख 39 हजार 300, अक्कलकुवा 1 लाख 13 हजार 900 तर धडगाव तालुक्यात 11 हजार लीटर डिङोल पडून आह़े जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी अवजड वाहने, पीकअप, भाजीपाला वाहून नेणारी वाहने, पालिकांचे कचरा उचलणारे ट्रॅक्टर आणि शासकीय वाहनांच डिङोल विक्री होत असल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात डिङोल साठा शिल्लक आह़े ग्रामीण भागात शेतीकामे करणा:या शेतक:यांना डिङोल विक्री सुरु असली तरी त्याची विक्री खूप मोठी नाही़ 

Web Title: 17 lakh liters of petrol and dingol fall into the pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.