नंदुरबार जिल्ह्यातील 17 हजार परीक्षार्थी दहावी उत्तीर्ण
By admin | Published: June 13, 2017 05:06 PM2017-06-13T17:06:39+5:302017-06-13T17:06:39+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वीचा निकाल जाहिर झाला आह़े
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.13 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वीचा निकाल जाहिर झाला आह़े यात नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 86़38 टक्के लागला असून यात मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आह़े
जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रांवर झालेल्या 10 वीच्या परीक्षांचा निकाल परीक्षा मंडळाने मंगळवारी दुपारी एक वाजता जाहिर केला होता़ या नंदुरबार जिल्ह्यातील 20 हजार 742 पैकी 17 हजार 917 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने चौथ्या क्रमांकाचे यश मिळवले आह़े परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल घोषित झाल्यानंतर उत्सकुता लागून असलेले पालक आणि परीक्षांर्थी यांनी निकाल पाहण्यास सुरूवात केली होती़ सायबर कॅफे, खाजगी कॉम्प्युटर सेंटर, मोबाईल यासह विविध साधनांद्वारे निकाल पाहून घेतला होता़ शाळांमध्ये निकाल अद्याप देण्यात आले नसले, तरी शहरातील शाळांनी शाळेतून निकाल पाहण्याची व्यवस्था केली होती़ यामुळे शाळांमध्ये विद्याथ्र्याची गर्दी होती़ तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या तालुक्यातील शाळांमधूनही उत्तीर्ण विद्यार्थाचा गौरव करण्यात येत होता़ यंदा तालुकास्तरावर उत्तीर्ण विद्याथ्र्याची टक्केवारी वाढली आह़े
यंदा नंदुरबार जिल्ह्यातून 11 हजार 379 मुले परीक्षेला बसली होती़ यापैकी 9 हजार 604 उत्तीर्ण झाली आहेत़ मुलांची टक्केवारी 84़40 एवढी आह़े
जिल्ह्यातून 9 हजार 313 पैकी 8 हजार 187 मुली ह्या उत्तीर्ण झाल्या आहेत़ त्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही 88़79 टक्के एवढी आह़े
जिल्ह्यातून विशेष प्राविण्यासह 3 हजार 716, प्रथम श्रेणीत 9 हजार 197, द्वितीय श्रेणीत 4 हजार 669 तर पास श्रेणीत केवळ 335 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़
तालुकानिहाय आकडेवारीत यंदा जिल्ह्याने समाधानकारक मजल मारल्याचे स्पष्ट होत आह़े यंदा शहादा तालुक्यातून 5 हजार 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तळोदा 1 हजार 887 , नवापूर तीन हजार 856, नंदुरबार 5 हजार 888, अक्कलकुवा 2 हजार 619, धडगाव तालुक्यातून 1 हजार 384 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़
तालुकानिहाय टक्केवारीत तळोदा तालुक्याने 87़96 सह जिल्ह्यात प्रथम आह़े शहादा 86़12, नवापूर 88़82, नंदुरबार 84़03, अक्कलकुवा 88़46 तर धडगाव तालुक्याचा 84़39 टक्के निकाल लागला आह़े