डेंग्यूची लागण झाल्याने 18 वर्षीय युवती दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:40 AM2019-10-10T11:40:36+5:302019-10-10T11:40:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गाझी नगरातील 18 वर्षीय युवतीचा डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने उपचार सुरु असताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील गाझी नगरातील 18 वर्षीय युवतीचा डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ 8 रोजी युवतीचा मृत्यू झाल्यानंतर शहरात डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून घटनेनंतर आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आह़े
समीरा लतिफ मन्सूरी मयत युवतीचे नाव असून तिला 4 ऑक्टोबर रोजी डेंग्यूसदृश तापाची लागण झाली होती़ यानंतर तिच्या कुटूंबियांनी तिला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होत़े प्रकृती जास्त बिघडल्याने तिला धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना तिचा 8 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता़ ही माहिती आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून गाजीनगर परिसरात सव्रेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत आहेत़ नवापुर येथील दोन मुलांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने साथ आटोक्यात असल्याचे सांगितले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपासून नंदुरबार शहरात पुन्हा डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळून येत होत़े यातील बहुतांश रुग्णांना धुळे येथे दाखल करण्यात आले होत़े त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात गेल्या आठवडय़ात आठ तर तूर्तास सहा रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आह़े
जिल्हा रुग्णालयात यंदापासून डेंग्यूची तपासणी करण्यासाठी एलिझा टेस्टची सोय करण्यात आली आह़े तसेच डेंग्यु सदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती केली गेली आह़े मंगळवार्पयत या कक्षात चार रुग्ण दाखल होत़े तर डेंग्यूमुळे प्रकृती खराब असलेल्या एकास अतीदक्षता तर सुधारणा होत असलेल्या एका सामान्य विभागात ठेवण्यात आले होत़े रुग्णालयात सोय असतानाही शहरातील लागण झालेले निम्मे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत़ जिल्हा रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े
ुयुवतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने औषध फवारणी केल्याची माहिती दिली असली तरी गेल्या आठ दिवसांपासून शहरात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढूनही प्रशासनाने गांभिर्याने घेतलेले नसल्याने नागरिकांचे म्हणणे आह़े घरात साठवलेल्या उघडय़ा पाण्यावर रसायन टाकले जात असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून जागोजागी साठून असलेल्या पाण्याचे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आह़े धुळे चौफुली परिसरातून वाहणा:या नाल्यांचे पाणी काही ठिकाणी साचून असल्याने त्याठिकाणी डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आह़े हिवताप विभागाने माहिती दिल्यानंतर पालिका कर्मचारी त्या-त्या भागात धुरळणी व फवारणी करत असल्याचेही सांगण्यात आले आह़े