गेल्या महिनाभरात 20 दुचाकी चोरीस
By admin | Published: February 3, 2017 12:50 AM2017-02-03T00:50:33+5:302017-02-03T00:50:33+5:30
नंदुरबार : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण कायम आहे. चो:यांना आळा घालण्यात पोलिसांना यश येत नसल्याची स्थिती आहे.
नंदुरबार : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण कायम आहे. चो:यांना आळा घालण्यात पोलिसांना यश येत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात 20 पेक्षा अधिक दुचाकी चोरीस गेल्या आहेत.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दररोज जिल्ह्यातील कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला जात आहे. पंधरवडय़ापूर्वी पोलिसांनी तळोदा तालुक्यातील एकास ताब्यात घेतले होते. त्याने 20 ते 25 मोटारसायकली काढून दिल्या आहेत. त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. परिणामी चोरीच्या घटना कायम आहेत.
जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास यंत्रणा राबविणे आवश्यक आहे. मोटारसायकल चोरीनंतर तिचे स्पेअरपार्ट काढून ते विक्री करणारी टोळीदेखील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.