20 हजार शेतकरी सन्मानाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:25 PM2017-10-24T12:25:26+5:302017-10-24T12:25:26+5:30
आयटी विभागाकडून याद्यांची प्रतिक्षा : रब्बीच्या कामांना लवकरच होणार सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या आठवडय़ात शेतक:यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरूवात करण्यात आली होती़ यानंतर शेतक:यांच्या समस्या मिटून कजर्मुक्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती़ मात्र माहिती तंत्रज्ञान विभागाने पात्र शेतक:यांच्या याद्याच जाहिर केलेल्या नसल्याने जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी कजर्मुक्ती सन्मानाच्या प्रतिक्षेत आहेत़
सन्मान योजनेंतर्गत गेल्या 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात 20 शेतक:यांना कजर्मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र वाटप केले गेले होत़े यानंतर कजर्माफीसाठी अर्ज दाखल केलेल्या 100 शेतक:यांची यादी जाहिर करून येत्या काळात पात्र ठरलेल्या 20 हजार 125 शेतक:यांची यादी राज्यस्तरावरून लवकरच जाहिर करून त्यांना कजर्मुक्त करण्याची घोषणा झाली होती़ यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे एक पथक तयार करून जिल्हास्तरावरील याद्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती़ हे कार्य दिवाळीत पूर्ण होऊन दिवाळीनंतर शेतक:यांना लाभ देण्याचे नियोजन होत़े मात्र आठवडा पूर्ण झाल्यानंतरही कजर्मुक्तीसाठी पात्र शेतक:यांच्या याद्या पुर्नतपासणी करून तयार झालेल्या नसल्याने त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेल्या नसल्याची माहिती आह़े यामुळे चालू आठवडय़ात कजर्मुक्ती योजना रखडण्याची चिन्हे आहेत़
येत्या काही दिवसात रब्बीच्या कामांना सुरूवात होणार आह़े त्यात शेतक:यांना आर्थिक आधाराची गरज लागणार आह़े कजर्मुक्ती झाल्यास शेतक:यांना सहकारी संस्थांकडे उचल घेता येणे शक्य होणार आह़े