नंदुरबारात रोज 200 किलो प्लॅस्टीक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:52 AM2017-11-18T11:52:39+5:302017-11-18T11:52:50+5:30
आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर : पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे
Next
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाकडून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्या व निवासी हॉटेल्समध्ये विकल्या जाणा:या प्लॅस्टीकच्या पाण्याच्या बाटल्यावर बंदी आणण्याची कार्यवाही करण्यात येत आह़े परंतु नंदुरबार शहरात अद्यापही छोटय़ापासून ते बडे व्यापारी बिनधास्तपणे प्लॅस्टीकच्या पिशव्याचा वापर करीत असल्याची स्थिती आह़ेशासनाकडून घेण्यात येणा:या ‘प्लॅस्टीकमुक्त महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पाश्र्वभूमिवर ‘लोकमत’तर्फे नंदुरबार शहरातील प्लॅस्टीकच्या वापराचे सव्रेक्षण करण्यात आल़े नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दर दिवसाला सुमारे 200 किलो प्लॅस्टीकच्या कच:याची उचल करण्यात येत असत़े कच:याचे संकलन करताना ओला व सुका कचरा असे विभाजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितल़े परंतु असे असूनही प्लॅस्टीक कचरा तयार होणे थांबायचे नाव घेत नाही़ त्यामुळे या परिस्थितीवर वचक बसणार कसा असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना भेडसावत आह़े मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आणली जावी यासाठी वेळावेळी व्यापा:यांची बैठक घेण्यात आली आह़े वारंवार सुचना देऊनही ज्या व्यापा:यांकडून आदेशाचे पालन झाले नाही अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली़ दंडात्मक कारवाई होऊनही जे व्यापारी यास जुमानत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही प्रक्रीया करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येत असली तरी, नागरिकांनीही याबाबत लक्ष देऊन प्लॅस्टीक पिशव्यांची मागणी न करता इको फ्रेंडली पध्दतीने कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आह़े