नंदुरबारातील २०० भटक्या कुत्र्यांचा मुक्काम जंगलात हलवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:23 PM2020-12-10T13:23:25+5:302020-12-10T13:23:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या ...

200 stray dogs from Nandurbar moved to forest | नंदुरबारातील २०० भटक्या कुत्र्यांचा मुक्काम जंगलात हलवला !

नंदुरबारातील २०० भटक्या कुत्र्यांचा मुक्काम जंगलात हलवला !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या मोहिमेने गती घेणे आवश्यक आहे. अधीक पथकांची नियुक्ती करून या मोहिमेचा उद्देश सफल करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आठवडाभरात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे.       
नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचा जायबंदी व्हावे लागले आहे.  एका बालिकेचा देखील त्यात बळी गेल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप पहाता पालिकेने लागलीच भटके कुत्रे पकडण्याची मोहिम हाती घेतली. परंतु सध्या सुरू असलेली मोहिम नावालाच असल्याचे चित्र आहे. आवश्यक साधनांचा अभाव, प्रशिक्षीत नसलेले कर्मचारी यामुळे आठ दिवसात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांची दहशत अद्यापही शहरात कायम आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच वावरावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर मोठी दहशत असते.  

एक वाहन आणि १२ कर्मचारींवर मदार... 
पालिकेकडे कुत्रे पकडण्याची आवश्यक ती साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने अर्थात दोरीचा फास तयार करून कुत्र्यांचा पाठलाग करून ते पकडले जात आहे. सध्या एक वाहन आणि १२ कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. 

६० किलोमिटर लांब जंगलात सोडले
शहरातून पकडलेल्या कुत्र्यांना जंगलात सोडले जात आहे. शहरापासून किमान ५० ते ६० किलोमिटर लांब पालिकेचे वाहन जात आहे. जेथे गाव किंवा वस्ती आसपास नाही अशा जंगलाच्या भागात या कुत्र्यांना आतापर्यंत सोडण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. येत्या काळात पथक वाढविण्यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. 

या प्रमुख भागांत त्रास : मांस विक्री ज्या भागात होते त्या भागात सर्वाधिक त्रास भटक्या कुत्र्यांचा आहे. याशिवाय दाटीवाटीच्या वस्ती, शहरातील मोकळ्या भागातील वस्ती यासह सार्वजनिक चौकांमध्ये भटक्या कु्त्र्यांचा सर्वाधिक त्रास आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी स्वच्छता ठेकेदाराच्या माध्यमातून पथक तयार करण्यात आले आहे. प्राणी संरक्षण अधिनियमान्वये त्यांचा छळ करणे किंवा ठार मारता येत नाही. त्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडावे लागत आहे. 
-रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार.

पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू केली असली तरी त्याला गती येणे आवश्यक आहे. कुत्रे पकडतांना ते एका भागातून दुसऱ्या भागात पळून जातात. त्यामुळे दुसऱ्या वसाहतीमधील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे.
- जयेश पाटील, नागरिक, नंदुरबार. 

Web Title: 200 stray dogs from Nandurbar moved to forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.