नंदुरबारातील जिल्हा कृषी विभागात 201 पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:48 PM2018-03-24T12:48:42+5:302018-03-24T12:48:42+5:30
पर्यवेक्षकांची 97 पद भरतीची प्रतिक्षा : विविध कामांवर परिणाम
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : राज्य शासनाकडून रिक्त पदांची भरती होत नसल्याने जिल्हा कृषी विभागात कामकाजावर परिणाम होत आह़े जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व इतर तालुका कार्यालयात तब्बल 201 पदे रिक्त असून यातून प्रभारी कामकाजाचा बोजा वाढत आह़े
राज्यशासनाकडून जिल्ह्यातील कृषी कार्यालयांसाठी 474 पदे मंजूर करण्यात आली होती़ वर्ग 1, 2, 3 आणि 4 या संवर्गातील पदांवर वेळावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे रिक्त राहिल्याने कामकाज थंडावत आह़े जिल्ह्यातील 586 ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील 952 गावांमध्ये शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवणा:या कृषी विभागाकडे 16 कृषी पर्यवेक्षक आणि 97 कृषी सहायक यांची पदे रिक्त आहेत़ गेल्या तीन वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये 30 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाल्याने त्यांच्या कामाचा भारही इतर कर्मचा:यांवर आला आह़े
कृषी संचालनालय पुणे यांच्याकडे जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा प्रशासनाकडून सातत्याने पाठवला जात आह़े राज्यात सर्वच ठिकाणी कर्मचा:यांची पदे रिक्त आहेत़ यातही जिल्ह्यात नियुक्ती मिळण्यासाठी उत्सुक असलेल्या 50 पेक्षा अधिक कर्मचा:यांच्या बदल्या स्थगित करण्यात आलेल्या असल्याचे सांगण्यात आले आह़े ग्रामीण भागात शेतक:यांच्या पिकपाणी सोबत रासायनिक खते, किटनाशके, फवारणी आणि इतर कृषीपयोगी योजनांची माहिती पडताळून पोहोचवणा:या कृषी पर्यवेक्षकांची 52 पदे मंजूर होती यातील 16 पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढल्याचे वेळावेळी सांगण्यात येत आह़े ग्रामीण भागात योजनांसोबत मार्गदर्शन कार्यक्रम रखडत असल्याचे मुख्य कारण रिक्त पदे असल्याचे सांगण्यात आले आह़े
शेतक:यांच्या सर्वाधिक जवळ असलेल्या कृषी सहायकांची जिल्ह्यात 243 पदे निर्माण करण्यात आली होती़ यातील 97 पदे रिक्त आहेत़ उर्वरित 146 कृषी सहायक हे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सेवा देत आहेत़ एका सहायकावर 15 ते 20 गावांचा भार असल्याने कामे आटोपतील कधी असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आह़े कृषी विभागात विविध वाहनचालकांचे 10 पदे मंजूर आहेत़ यातील 6 रिक्त असल्याने 4 पदांवर भार आह़े
रिक्त पदांमुळे योजनांची गती कमी असतानाच कृषी विभागाकडून चालवल्या जाणारी कार्यालये आणि उपक्रमांसाठीही कर्मचारी नसल्याचे दिसून आले आह़े यात कृषी विभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपमळा मदतनीस या पदाची निर्मिती झाली होती़ यात मंजूर झालेल्या 15 पैकी 14 पदे पूर्णपणे रिक्त आहेत़ वाटिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कार्यालयांच्या सुरक्षेसाठी शिपाई आणि पहारेकरींची 52 पैकी 24 पदे रिक्त आहेत़ ही पदे कधी भरली जाणार याबाबत कृषी विभागाच्या अधिका:यांकडूनही ठोस अशी माहिती देण्यात आलेली नाही़ तूर्तास कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून कामकाजाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न सुरू आह़े