खोंडामळी येथील शिबिरात 22 जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:28 PM2018-04-21T13:28:32+5:302018-04-21T13:28:32+5:30
लोकमत ऑनलाईन
लहान शहादे, दि़ 21 : नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील ग्रामीण रुग्णालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात महिला कर्मचा:यांसह 22 जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच सुनंदा साहेबराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या पथकाने रक्तसंकलन केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलोचना बागुल, डॉ.पल्लवी पावरा, डॉ.सोनल सोनी, डॉ.सुशील मराठे, सुजाता दहिवेलकर, औषध निर्माण अधिकारी पी.बी. पाटील, ग्रामसेवक, विखरण येथील संजय पाटील, साहेब सावंत, हेमलता मराठे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
शिबिर यशस्वितेसाठी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा:यांसह रुग्णकल्याण समिती सदस्य व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.