वाहन उलटून 22 भाविक जखमी : देवमोगरा यात्रोत्सवासाठी जाताना अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:07 PM2018-02-15T12:07:53+5:302018-02-15T12:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उचिशेवडी ता़ नवापूर गावाजवळ पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात 23 जण जखमी झाले आह़े हे भाविक देवमोगरा ता़ सागबारा येथे दर्शनासाठी जात होत़े बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
साक्री तालुक्यातील सावरपाडा ता़ साक्री येथील भाविक एमएच 18 एए 4523 या पिकअप वाहनाने देवमोगरा येथे दर्शनासाठी जात होत़े धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर उचिशेवडी गावाजवळ त्यांचे वाहन आले असता, भरधाव वेगातील पिकअपवरून चालकाचा ताबा सुटल्याने ते रस्त्याच्या बाजूला उलटल़े यात वाहनातील 23 भाविक जखमी झाल़े यात सुमाबाई आनंदा देसाई (30), आनंदा मोतीराम देसाई (35) व बावा फुलजी गावीत (40) तिघे रा़ सावरपाडा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आल़े अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला़ जखमींवर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ़ अजय कुवर, परिचारिका रेखा सोळंकी, सारिका वसावे, छबीबाई वळवी यांच्यासह कर्मचा:यांनी उपचार केल़े
अपघातात दीपक नरेंद्र पवार (20), विष्णू पिंटय़ा गावीत (15) रा. गुंजाळ, उमेश सुरेश देसाई (18), प्रमिलाबाई रतिलाल गावीत (30), रतिलाल विरजी गावीत (35), गुली सुरेश देसाई (33), ईतमाबाई बावा गावीत (40), वसंती रामदास देसाई (48), सोहम अमिसिंग देसाई (पाच, मावची विजय सुभाष (17), उर्मिला राजू देसाई (30), समीर वेटय़ा गावीत (पाच), रोहन कैलास पवार (सात), राजू कैलास देसाई (28), शांताराम भाद्या पवार (45), सुमा आनंदा देसाई (30), आनंदा आतिराम देसाई (35), अशोक दत्तू पवार (35), बावा फुलजी गावीत (40), बाबुलाल केस:या देसाई (32), अरूण शंकर देसाई (35), युवराज आनंदा देसाई (नऊ), सकाराम लाश्या अहिरे (40) सर्व रा़ सावरपाडा ता़ साक्री जि़धुळे अशी जखमींची नावे आहेत़
याबाबत दिपक नरेंद्र पवार याच्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भिमसिंग ठाकरे करत आहेत़
अपघात झाल्यानंतर विसरवाडी व उचीशेवडी येथील नागरिकांनी मदतकार्य केल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळाल़े ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचा:यांकडून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होत़े नंदुरबार येथील दाखल जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े