बनावट कागदपत्रांद्वारे 22 वाहनांचे हस्तांतरण : नंदुरबार आरटीओची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:47 PM2018-03-17T12:47:21+5:302018-03-17T13:15:16+5:30

शहाद्याच्या एकाविरुद्ध गुन्हा

22 vehicles transfer by fake documents: Nandurbar RTO fraud | बनावट कागदपत्रांद्वारे 22 वाहनांचे हस्तांतरण : नंदुरबार आरटीओची फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे 22 वाहनांचे हस्तांतरण : नंदुरबार आरटीओची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बनावट नाहरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्र आरटीओ कार्यालयात सादर करून तब्बल 22 वाहने हस्तांतर केल्याचा प्रकार शहादा येथील एकाने केला. आरटीओच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनसिंग राजपूत, रा.शहादा असे संशयीताचे नाव आहे. राजपूत यांनी बीड जिल्ह्यातून टिपर प्रकारची 22 वाहने नंदुरबार आरटीओ कार्यालयात हस्तांतरीत केली. बीड आरटीओ कार्यालयाचे बनावट हस्तांतर पत्र, नाहरकत दाखला व इतर कागदपत्रे त्यांनी नंदुरबार आरटीओ कार्यालयात सादर केली. त्याआधारे येथील आरटीओ कार्यालयाने 22 वाहने हस्तांतर केली. संबधीत वाहनांची कागदपत्रे अधीक पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने नंदुरबारचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप वामन खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून धनसिंग राजपूत यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: 22 vehicles transfer by fake documents: Nandurbar RTO fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.