दोन तासांच्या बैठकीत 223 विषयांना मंजुरी
By admin | Published: February 17, 2017 11:12 PM2017-02-17T23:12:05+5:302017-02-17T23:12:05+5:30
शहादा पालिका : 17 लाख 83 हजारांचा शिलकी अर्थसंकल्प सादर
शहादा : शहरातील विकास कामे करताना त्या प्रभागातील नगरसेवकांना त्याची पूर्वकल्पना देणे. तसेच प्रत्येक सभेपूर्वी टिप्पणी झाल्याशिवाय विषय अजेंडय़ावर घेऊ नये, अशा सूचना नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिल्या. सव्वा दोन तास चाललेल्या या सभेत 2017-18 साठी 17 लाख 83 हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पासह 223 विषयांना मंजुरी देण्यात आली.
शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा कै.काशीनाथभाई पाटील सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते. सभेला उपनगराध्यक्षा रेखा भानुदास चौधरी, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्यालय अधीक्षक गजानन सावळे यांनी अहवाल वाचन केले. सभा सुरू होताच नगरसेवक प्रा.मकरंद पाटील यांनी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विषय अजेंडय़ावरील 16 विषय नामंजूर करण्यात यावेत, चार विषय योग्य ती दुरुस्ती करून पुढील सर्वसाधारण सभेत मांडावेत व 10 विषयांवर मुख्याधिका:यांनी कायदेशीर निर्णय घेऊन कार्यवाही करावी. विषय क्रमांक 22 हा दोनवेळा घेण्यात आलेला होता.
विषय अजेंडय़ावरील विषयांचे वाचन करण्यापेक्षा सर्व नगरसेवकांना विषय टिप्पणी दिली आहे. योग्या त्या विषयावर सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे. शहराच्या विकास कामांसाठी मुख्याधिका:यांनी सहा महिन्यार्पयत कार्यालय सोडू नये. पालिका हद्दीतील 200 पेक्षा जास्त आरक्षित जागा आहेत. त्यापैकी काही मालकांनी जागा हस्तांतरित केलेली नाही. त्याचा त्वरित सव्रे करून मगच विकास कामे करावीत, असे प्रा.मकरंद पाटील यांनी सांगितले. पालिकेत निम्मेपेक्षा जास्त महिला नगरसेविका असून उपनगराध्यक्षपदीही महिला आहेत. तसेच पालिकेत तक्रारी व समस्या मांडण्यासाठी येणा:या महिला या सर्वासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी नगरसेवक संजय साठे यांनी केली. युवकांसाठी लाखो रुपये खर्च करून क्रीडा मैदान उभारले आहे. मात्र ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी नगरसेवक संदीप पाटील यांनी आयत्यावेळी येणा:या विषय चर्चेप्रसंगी केली. विषय क्रमांक चार, पाच, सहा व सात हे विषय अर्थसंकल्पाशी निगडित असल्याने योग्य त्या दुरुस्ती करून हे विषय पुढील सभेत चर्चेत घ्यावेत, असे मत नगरसेवक लक्ष्मण बढे यांनी मांडले. विषय क्रमांक 36 दुकान संकुल व पालिका इमारत बांधकाम हा होता. याबाबत पालिकेने विचार करावा, असे प्रा.पाटील यांनी सांगितले.
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, शहराच्या विकास कामांसाठी सत्ताधारी गटासह विरोधक नगरसेवकांना विश्वासात घेण्यात येईल. त्या त्या विभागाकडे किती निधी पडला आहे त्यानुसार प्रस्ताव ठेवून विषय मंजुरीसाठी ठेवावेत. गेल्या दोन वर्षापासून सफाई कामगार महिला कामावर आली नाही. या महिला कामगाराने आरोग्य स्वास्थ्य ठिक नसल्याचे कारण पुढे केले असून मुख्याधिका:यांनी याबाबत प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कार्यवाही करावी अन्यथा कामावर रूजू करू नये. शहराच्या विकास कामांसाठी स्थानिक आमदार-खासदार व विकास निधी किती उपलब्ध होणार याबाबत आज सांगणे अशक्य आहे. मात्र भविष्यात विकास कामांसाठी निधीचे नियोजन कसे असावे यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी जागृतपणे काम करावे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या कामांना न्याय द्यावा, असे सांगून नगरसेवकांनी विषय देताना नियोजनपूर्वक द्यावेत, असे नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले. या वेळी नगरसेवक आनंदा पाटील, रेखा पाटील, नाना निकुंभे, संजय साठे, विद्या जमदाळे, लक्ष्मण बढे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)
शहादा शहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ज्ॉकवेल येथे कार्यक्षम अधिकारी नेमावा, असे नगरसेविका योगिता वाल्हे यांनी सूचित केले. पालिकेने शहराला पाणीपुरवठा करणारी योजना हस्तांतरित करताना सर्व बाबींची पूर्णता करून घेणेही गरजेचे असल्याचे सांगून पालिकेतील रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचा:यांच्या पदांबाबतही पालिकेने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
स्व.पी.के. अण्णांनी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आदर्शाची रुजवणूक केली आहे. पालिकेच्या माध्यमातून शहर विकास घडवून आणणे आपले ध्येय आहे. नगराध्यक्षपदी जरी भाजपाचे असले तरी विकास कामांसाठी आपण त्यांना सहकार्य करू, असे यापूर्वीच घोषित केले आहे. निव्वळ विरोधासाठी विरोध हे सूत्र आपणास मान्य नसल्याने विकासाच्या सर्व मुद्यांना आमच्या नगरसेवकांचा सतत पाठिंबा राहणार आहे.
-दीपक पाटील, चेअरमन, सातपुडा साखर कारखाना
शहरवासीयांच्या प्राथमिक अपेक्षा व गरजा पाणी, रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेच्या असतात. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती व्हावी यासाठी आमचे सर्व नगरसेवक सत्ताधारी नगराध्यक्षांसह त्यांच्या टीमला सहकार्य करतील. प्राथमिक शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी भविष्यातही सहकार्याची भूमिका राहील.
-प्राचार्य मकरंद पाटील, स्वीकृत नगरसेवक, शहादा पालिका