नंदुरबार मतदारसंघात चार तासात २२.७५ टक्के मतदान;
By मनोज शेलार | Published: May 13, 2024 12:46 PM2024-05-13T12:46:12+5:302024-05-13T12:48:51+5:30
नंदुरबारलोकसभा मतदारसंघातील २,११५ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी वाढणारे तापमान लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान करण्यावर भर दिला.
नंदुरबार : नंदुुरबार मतदारसंघात पहिल्या चार तासात सरासरी २२.७५ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. दरम्यान, भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावित,कॉंग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी, मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर सकाळी मतदान केले.
नंदुरबारलोकसभा मतदारसंघातील २,११५ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी वाढणारे तापमान लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान करण्यावर भर दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी रांगा दिसून आल्या. पहिल्या दोन तासात ८.९३ टक्के मतदान झाले होते. तर चार तासात अर्थात सकाळी ११ वाजेपर्यंत २२.७५ टक्के मतदान झाले.
दरम्यान, सातपुड्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रांची आकडेवारी येण्यास वेळ लागत असल्याने मतदानाची निश्चित आकडेवारी काढण्यास प्रशासनाला वेळ लागतो. दुर्गम भागात ज्या ठिकाणी संपर्काचे साधन नाही तेथे रनरच्या माध्यमातून आकडेवारी मुख्यालयाला कळवावी लागते.