नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २३ कोटींचा निधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:54 PM2017-12-08T15:54:59+5:302017-12-09T04:19:10+5:30

अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजनाप्रसंगी नंदुरबार जिल्हा पर्यटनासाठी ‘आकर्षक’ बनवविण्याचा केला संकल्प

23 crores fund for tourism development in Nandurbar district: Chief Minister Devendra Fadnavis | नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २३ कोटींचा निधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २३ कोटींचा निधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उवाच...महाभारतकालात सारंंगखेडा अश्वमहोत्सवाच्या पाऊलखुणाछत्रपती शिवाजी महाराज यांची घोडी, महाराणा प्रताप यांचा चेतक हे शौर्याचे प्रतिकसारंगखेडा येथील अश्व संग्राहालय ठरणार जगाचे आकर्षणतोरणमाळ येथे पर्यटन संकुल, तापी रिव्हरफ्रंट वॉटर स्पोर्टस आणि प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिराचा विकास करणार

नंदुरबार : सारंगखेड्यात चेतक फेस्टीवलसोबतच वॉटर स्पोर्टस पर्यटन विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे़ येथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटसाठी पाच कोटी रूपयांचा निधी देत आहे़ आदिवासी संस्कृती पर्यटन विभागाच्या माध्यमातून लोकांपुढे न्यायची आहे़ यासाठी जिल्ह्याला अधिक आकर्षक तयार करून पर्यटकांपुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़ यावेळी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी २३ कोटींच्या निधीची घोषणा त्यांनी केली. सारंगखेडा ता़ शहादा येथील अश्वसंग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते़.
यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, प्रधान सचिव नितीन गद्रे, विभागीय आयुक्त महेश झगडे, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, विक्रांत रावल, आशुतोष राठोड, उद्योजिका रेखा चौधरी, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़
प्रसंगी मुख्यमंत्री देंंवेद्र फडणवीस यांनी सांगितले की, सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये लावलेल्या चित्रप्रदर्शनात संशोधकांनी ३०० वर्षांपूर्वी हा अश्वमहोत्सव होत असल्याचे नमूद केले आहे़ परंतू खरे पाहता महाभारतकालात सारंंगखेडा अश्वमहोत्सवाच्या पाऊलखुणा सापडत आहेत़ घोडा किंवा अश्व हा मानवासाठी एक आकर्षण राहिला आहे़ छत्रपती शिवाजी महाराज यांची घोडी, महाराणा प्रताप यांचा चेतक हे शौर्याचे प्रतिक आहेत़ अशा या ऐतिहासिक प्राण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे़ सारंगखेडा यात्रोत्सवाच्या माध्यमातून ही संकल्पना पूर्ण होत आहे़

सारंगखेडा येथे निर्माण होणारे अश्व संग्राहालय हे जगाचे आकर्षण बनणार आहे़ याठिकाणी आमदार डॉ़ विजयकुमार यांनी केलेल्या घोड्यांचे प्रजनन केंद्र आणि दवाखाना यांचाही विचार केला जाणार आहे़ प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले़ यानंतर चेतक फेस्टीवलअंतर्गत घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह जयकुमार रावल, आमदार डॉ़ गावीत व खासदार डॉ़ हीना गावीत यांनी अश्व बाजारात फेरफटका मारून माहिती जाणून घेतली़


पर्यटनासाठी २३ कोटींची तरतूद
सारंगखेडा येथील भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी २३ कोटी रूपये देण्याची घोषणा केली़ या रकमेतून पर्यटन विभागामार्फत तोरणमाळ येथे पर्यटन संकुल, तापी रिव्हरफ्रंट वॉटर स्पोर्टस आणि प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिराचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली़ यावेळी त्यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या योजना ह्या दूरदृष्टीच्या असल्याचे सांगितले़

Web Title: 23 crores fund for tourism development in Nandurbar district: Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.