रुग्णांच्या बसच्या अपघातात 23 जण किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:59 AM2019-09-03T11:59:36+5:302019-09-03T11:59:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेत्र शस्त्रक्रियेसाठी घेवून जाणा:या बसला समोरून येणा:या पीक अप वाहनाने धडक दिल्याने बस रस्त्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नेत्र शस्त्रक्रियेसाठी घेवून जाणा:या बसला समोरून येणा:या पीक अप वाहनाने धडक दिल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. या अपघातात 25 रुग्णांना किरकोळ मार लागला. याप्रकरणी पीकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार-वाका रस्त्यावर हा अपघात झाला होता. गुजरातमधील आनंद येथे डोळ्यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील काही रुग्णांना घेवून बस (क्रमांक जीजे 23-टी 9413) जात होती. समोरून भरधाव आलेल्या पीक अप वाहनाने (क्रमांक एमएच 39 सी 9699) समोरून धडक दिली. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून दगडाला ठोकली गेली. या अपघातात रंजना रणजित सिसोदे, रा.नरडाणा, जुबेदाबानो मोहमद नसीर, रा.धुळे, नूर मोहमद शेख भिकारी, रा.नरडाणा यांच्यासह 23 रुग्ण जखमी झाले.
याबाबत बसचालक हसमूखभाई सोमाभाई प्रजापती रा.बोरसद, गुजरात यांच्या फिर्यादीवरून पीकअप चालक निलेश विरसिंग गावीत, रा.दापूर, ता.नवापूर याच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कैलास मोरे करीत आहे. जखमींवर नंदुरबारात उपचार करून घरी जावू देण्यात आले.