कृषी महोत्सवात नंदुरबारातील 23 खेळाडुंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:06 PM2018-02-15T12:06:53+5:302018-02-15T12:07:00+5:30

23 participants from Nandurbar in the Krishi Mahotsav | कृषी महोत्सवात नंदुरबारातील 23 खेळाडुंचा सहभाग

कृषी महोत्सवात नंदुरबारातील 23 खेळाडुंचा सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य कृषी विभागातील क्रीडा महोत्सव तरंग 2018 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 23 खेळाडुंनी सहभाग नोंदविला.
यात खो-खो, कबड्डी, क्रीकेट, हॉलीबॉल, बॅडमिन्टन, टेबल टेनिस, गोळा फेक, लांब उडी, धावणे, कॅरम आदी खेळांचा समावेश होता. त्यात कृषी विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचारी व महिला-पुरूषांनी सहभाग नोंदविला. हा महोत्सव दापोली, ता.रत्नागिरी येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात झाला. गोळाफेकमध्ये कृषी सहाय्यक स्नेहल मनोहर बोरसे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर प्रशांत शेंडे यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे साहेबराव देसाई यांनी लांब उडीत राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी खेळाडुंचे कौतुक होत आहे.
 

Web Title: 23 participants from Nandurbar in the Krishi Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.