पपईचा ट्रक उलटून 24 जखमी
By admin | Published: January 14, 2017 12:10 AM2017-01-14T00:10:27+5:302017-01-14T00:10:27+5:30
नंदुरबार : पपई भरून जाणारा ट्रक नळवानजीक उलटल्याने 24 मजूर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
नंदुरबार : पपई भरून जाणारा ट्रक नळवानजीक उलटल्याने 24 मजूर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रस्ता काम सुरू असताना चालकाला अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला हा ट्रक उलटला.
नंदुरबार तालुक्यातील गुजरभवाली शिवारातून कच्ची पपई भरून ट्रक (क्रमांक एमपी 09-एचजी 9257) नंदुरबारकडे येत होता. राजापूर ते नळवा दरम्यान सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मातीचा भराव रस्त्याच्या दोन्ही बाजुला टाकण्यात आलेला आहे. समोरून येणा:या वाहनाला साईट देताना ट्रक चालकाच्या बाजुलने रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमध्ये आणि केबीनच्या वर एकूण 33 मजूर बसलेले होते ते सर्व फेकले गेल्याने त्यातील 24 जण जखमी झाले.
जखमींना तातडीने नळवा, राजापूर व गुजरभवाली येथील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी 15 ते 40 वयोगटातील आहेत. सर्व जखमी हे सिरसाणी, ता.धडगाव व तुळाजा, ता.तळोदा येथील आहेत. जखमींमध्ये धडगाव तालुक्यातील शिरसाणी येथिल शकिला माकत्या ठाकरे (18), रंजीला आमश्या ठाकरे (20), रविता आमश्या ठाकरे (17), पेखी सन्या ठाकरे (33), शेवंती जयसिंग पटले (40), मिनी सायसिंग वळवी (15), जयसिंग गोमता ठाकरे (27), शायसिंग बामण्या ठाकरे (40), वंदना संज्या ठाकरे (16), मालती देध्या ठाकरे (20), जिपला मानसिंग वळवी (22), मानसिंग सोन्या वळवी (24), भिमसिंग सोन्या वळवी (13), राकेश देध्या ठाकरे (19), गुलाबी काल्या ठाकरे (20), सरदार सीमा पटले (18) आणि तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील कुवंरसिंग मगण पवार (15), दुर्गा सोमा वळवी (18), शर्मिला सुनील पवार (18), ज्योती तान्हाजी ब्राम्हणे (16), कालुसिंग दिवटय़ा नाईक (45), विशाल कालुसिंग नाईक (22), पूर्णिमा तानाजी नाईक (18), मंगला तान्हाजी पावरा (22) यांचा समावेश आहे.