मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांना केले क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:07 PM2020-04-27T14:07:39+5:302020-04-27T14:07:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २५ पोलिस कर्मचाऱ्यांना मालेगाव येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. तेथील बंदोबस्ताचा कालावधी संपल्यानंतर ...

 25 police personnel who went to Malegaon for security were quarantined | मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांना केले क्वॉरंटाईन

मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांना केले क्वॉरंटाईन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील २५ पोलिस कर्मचाऱ्यांना मालेगाव येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. तेथील बंदोबस्ताचा कालावधी संपल्यानंतर हे कर्मचारी नंदुरबारात येताच त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्य तपासणीत कुठलीही लक्षणे दिसून आली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मालेगाव येथे कोरोनाचा वाढता प्रकोप आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी नंदुरबार पोलीस दलातील २५ कर्मचाºयांनाही पाठविण्यात आले होते. त्यांच्या बंदोबस्ताचा कालावधी संपल्यानंतर हे सर्व कर्मचारी दोन दिवसांपूर्वी नंदुरबारात आले. येथे येताच त्यांची आधी जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या कर्मचाºयांमध्ये कुठलेही लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने या कर्मचाºयांना नंदुरबारातील संस्थात्मक क्वॉरंटाईन केंद्रात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील आरसीपी प्लाटूनच्या १८ कर्मचाºयांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यातही कुठलेही लक्षणे नव्हती. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधीही लवकरच पुर्ण होणार आहे.

Web Title:  25 police personnel who went to Malegaon for security were quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.